'या' एका सोप्या गोष्टीमुळे तुम्ही वाढवू शकता आयुष्य, कसं ते जाणून घ्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 10:48 AM2019-09-09T10:48:46+5:302019-09-09T10:54:34+5:30
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, एका दिवसात ९ तासांपेक्षा अधिक वेळ बसणे मृत्यूला आमंत्रण देणं आहे.
(Image Credit : health.harvard.edu)
चालण्याचे वजन कमी करण्यासाठी किती आणि कसे फायदे होतात हे तुम्हाला माहीत असेलच. पण आता चालण्याने तुम्ही तुमचं आयुष्यही वाढवू शकता, असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, एका दिवसात ९ तासांपेक्षा अधिक वेळ बसणे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. फिजिकल अॅक्टिविटीला याआधीही जास्त आयुष्यासोबत जोडून बघितलं गेलं आहे. पण या रिसर्चमध्ये याच्या इन्टेसिटीला बघण्यात आलंय.
या रिसर्चमध्ये शारीरिक हालचालींची जसे की, चालणे, जेवण तयार करणे, भांडी घासणे, ब्रिस्क वॉक, क्लीनिंग जॉगिंग, जड साहित्य उचलणे यांसारख्या अॅक्टिविटींची तुलना केली गेली.
या रिसर्चमध्ये अभ्यासासाठी ३५३८३ लोकांना सहभागी करून घेण्यातत आले होते. या सगळ्यांचं वय ४० किंवा त्यापेक्षा जास्त होतं. त्यांना ५.८ वर्षांपर्यंत फॉलो करण्यात आलं. नंतर रिसर्चमधून असं समोर आलं की, कोणत्याही प्रकारची फिजिकल अॅक्टिविटी मग त्यांची तीव्रता कितीही असो, त्यांनी मृत्युचा धोका कमी होतो.
(Image Credit : news.harvard.edu)
मृत्युचा धोका ज्या लोकांमध्ये सर्वात जास्त आढळला ते लोक सर्वात जास्त आणि सर्वात कमी अॅक्टिव लोकांच्या मधील लोक होते. वैज्ञानिकांचं मत आहे की, पब्लिक हेल्थचा संदेश साधारण शब्दात असा असला पाहिजे की, 'कमी बसा आणि जास्त वेळ चालणं-फिरणं करा'.
(Image Credit : www.rcpi.ie)
यामुळेच म्हटलं जातं की, तुम्ही किती वेगाने फिजिकल अॅक्टिविटी करता याने काहीही फरक पडत नाही. हे अजिबात गरजेचं नाही की, एक दिवसात दोनदा जिमला जावं. कोणत्याही प्रकारच्या फिजिकल अॅक्टिविटीने तुमचं आयुष्य वाढतं.