दररोज केवळ २२ मिनिटे पायी चालणे अधिक फायद्याचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 11:57 AM2018-10-06T11:57:53+5:302018-10-06T11:58:31+5:30

हे सर्वांनाच माहीत आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या गतिहीन जीवनशैलीला बाजूला सारुन तुम्हाला अॅक्टिव लाइफस्टाइल जवळ करावी लागेल.

Walking for 22 minutes daily keeps you healthy | दररोज केवळ २२ मिनिटे पायी चालणे अधिक फायद्याचे!

दररोज केवळ २२ मिनिटे पायी चालणे अधिक फायद्याचे!

googlenewsNext

हे सर्वांनाच माहीत आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या गतिहीन जीवनशैलीला बाजूला सारुन तुम्हाला अॅक्टिव लाइफस्टाइल जवळ करावी लागेल. तुमच्या लाइफस्टाइलमधील केवळ एक बदल केल्यास तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांपासून, स्ट्रोक, डायबिटीज आणि इतकेच नाही तर कॅन्सरपासून बचाव करु शकता. 

एक्सरसाइज करुन तुम्ही वजन कमी करण्यासोबतच मसल्सही बनवू शकता. हाडे आणि जॉईंट्स मजबूत करु शकता, तसेच फिजिकल हेल्थ चांगली ठेवू शकता. त्यासोबतच एक्सरसाइज केल्याने तणाव आणि डिप्रेशनमधूनही बाहेर निघण्यास मदत मिळते. 

२२ मिनिटांच्या वॉकने होतो 'हा' फायदा

अॅक्टिव लाइफस्टाइलसाठी तुम्हाला दिवसभर जिममध्ये घाम गाळण्याची गरज नाहीये. एका नव्या शोधानुसार हा खुलासा झाला आहे की, दिवसातून केवळ २२ मिनिटांच्या वॉकींगने म्हणजे पायी चालण्यानेही तुमच्या फिटनेसमध्ये मोठा बदल बघायला मिळू शकतो. 
अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिन मेडिसीनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जे लोक दररोज कमीत कमी ३० मिनिटे वॉक करतात त्यांचा अवेळी मृत्यू होण्याचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. पण जे असं कसं करत नाहीत त्यांना अवेळी मृत्यू येऊ शकतो. 

परफेक्ट एक्सरसाइज वॉकींग

हा शोध पूर्ण करण्यासाठी १३ वर्ष लागलीत. शोधाचे लेखकांनी लिहिले आहे की, 'वॉकींग म्हणजेच पायी चालणे एक परफेक्ट एक्सरसाइज आहे. कारण ही एक सिंपल अॅक्शन आहे आणि पूर्णपणे फ्री आहे. तसेच इतर एक्सरसाइजपेक्षा सोपीही आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणाची गरज पडत नाही'.
 

Web Title: Walking for 22 minutes daily keeps you healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.