Health Tips: Weight loss ते गंभीर आजारांवर नियंत्रण, रात्री जेवणानंतर चालण्याचे अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 03:27 PM2022-03-14T15:27:48+5:302022-03-14T15:30:03+5:30

तुमचं वजन वाढत असेल तर रात्री चालणं खूप फायदेशीर (Walking benefits) मानलं जातं.

walking after dinner is extremely beneficial | Health Tips: Weight loss ते गंभीर आजारांवर नियंत्रण, रात्री जेवणानंतर चालण्याचे अनेक फायदे

Health Tips: Weight loss ते गंभीर आजारांवर नियंत्रण, रात्री जेवणानंतर चालण्याचे अनेक फायदे

googlenewsNext

अलिकडे धावपळीच्या जीवनशैलीमुळं कित्येक लोक रात्रीचे जेवण झाले की लगेच झोपायला जातात. असं करणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. तुम्हीही असंच करत असाल तर ही सवय लगेच बदलायला हवी. यामुळे अन्न लवकर पचत नाही आणि वजनही वाढतं. तुमचं वजन वाढत असेल तर रात्री चालणं खूप फायदेशीर (Walking benefits) मानलं जातं.

निरोगी आहार आणि चालण्यामुळं देखील रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. एवढेच नाही तर रात्री थंड हवेत फेरफटका मारून घरी परतल्यावर झोपही चांगली लागते. जाणून घेऊया रात्री जेवल्यानंतर चालण्याचे इतर फायदे काय (Benefits of Walking after Eating) आहेत.

रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारण्याचे फायदे
रात्री जेवल्यानंतर १५ ते ३० मिनिटे चालल्याने पचनशक्ती सुधारते. अन्न सहज पचतं. मात्र, जेवल्याबरोबर लगेच झोपी गेल्यानं पचनाची प्रक्रिया आणखी मंदावते, त्यामुळे पोटाच्याही अनेक समस्या उद्भवू शकतात. यापुढे जेवल्यानंतर नक्की फिरायला जा.

MedicalNewsToday मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, अनेक संशोधनांमध्ये असे समोर आले आहे की, जेवणानंतर थोडा वेळ चालणं किंवा फिरायला जाणं, यामुळे रक्तातील ग्लुकोज किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत  होते. रोज चालण्यानं (walking after eating) गॅस, पोट फुगणे, झोप न लागणे या समस्या कमी होतात, हृदय निरोगी राहते. मात्र, तुम्ही जेवल्यानंतर फिरायला जात असाल, तर त्याची तीव्रता, वेळ, अंतर याचीही काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा अपचन आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

जेवल्यानंतर चालण्याने मानसिक आरोग्य सुधारते. कारण चालण्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल कमी होतो. जेव्हा एखादी व्यक्ती फिरायला जाते तेव्हा शरीरात एंडोर्फिन सोडले जातात. हे नैसर्गिक वेदना कमी करणारे म्हणून काम करते. यामुळे चिंता कमी होते, मूड सुधारतो, तणाव कमी होतो आणि आरामदायी वाटतं.

जेवण आणि नंतर चालल्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. रोज व्यायाम केल्यास निद्रानाशाचा त्रास कमी होतो. त्यात चालण्याचाही समावेश आहे. नियमित चालण्याचा व्यायाम केल्यानं तुम्हाला लवकर झोप लागण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला रात्री लवकर झोप येत नसेल तर जेवणानंतर १०-१५ मिनिटे जरूर फिरा.

रक्तदाब वाढला तरी रात्री चालणे आरोग्यदायी मानले जाते. यामुळे तुम्ही हृदयविकार, पक्षाघातापासून वाचाल. उच्च रक्तदाब, LDL कोलेस्टेरॉल कमी होईल. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, निरोगी हृदयासाठी, एखाद्या व्यक्तीने आठवड्यातून ५ दिवस किमान ३० मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम केला पाहिजे. तुम्हाला हवे असल्यास रात्रीच्या जेवणानंतर ३० मिनिटे चालावे किंवा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर तीन वेळा १० मिनिटे चालावे.

Web Title: walking after dinner is extremely beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.