चांगल्या झोपेसाठी चालणं ठरतं अत्यंत फायदेशीर; रिसर्चमध्ये मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 04:49 PM2024-07-27T16:49:16+5:302024-07-27T16:56:15+5:30
चालणं हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर यामुळे झोपेची गुणवत्ता देखील सुधारू शकते.
चालणं हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर यामुळे झोपेची गुणवत्ता देखील सुधारू शकते. नियमित चालण्याने झोपेची गुणवत्ता सुधारते आणि झोप न येण्याची समस्या दूर होते, असं एका नवीन रिसर्चमधून समोर आलं आहे. संशोधकांना असं आढळून आलं की, जे लोक नियमितपणे चालतात त्यांना रात्री चांगली झोप येते आणि दिवसा जास्त ऊर्जा मिळते.
चालण्याने शरीराला आराम मिळतो आणि मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. याशिवाय, चालण्याने शरीराच्या सर्केडियन रिदममध्ये सुधारणा होते. ज्यामुळे झोपेचं चक्र नीट होतं. तसेच चालण्याचे आरोग्याला देखील अनेक फायदे होत असतात.
झोपेत होते सुधारणा
- चालण्यामुळे शरीर थकते आणि रात्री चांगली झोप लागते.
- चालण्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. तणाव कमी करून तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.
- चालण्याने मन शांत होते आणि तुमच्या चिंता कमी होतात. यामुळे रात्री चांगली झोप येते.
- नियमित चालण्याने तुमची दिनचर्या सुधारते आणि तुमच्या शरीराला ठराविक वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लागते.
- चालण्याने शरीराचे तापमान थोडे वाढते आणि नंतर हळूहळू कमी होते. हे शरीराला झोपेसाठी तयार करते.
'या' गोष्टींमुळेही लागू शकते चांगली झोप
व्यायाम करा
नियमित व्यायामामुळे शरीराला आराम मिळतो आणि मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
निरोगी आहार
निरोगी आहारामुळे झोपेची गुणवत्ता देखील सुधारू शकते. अभ्यासात असं आढळून आलं आहे की जे लोक निरोगी आहार घेतात त्यांना चांगली झोप येते आणि दिवसा अधिक उत्साही वाटते.
स्ट्रेस मॅनेजमेंट
स्ट्रेस मॅनेजमेंटमुळे झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की जे लोक स्ट्रेस मॅनेजमेंट करतात त्यांना चांगली झोप येते आणि दिवसा अधिक उत्साही वाटतं.