चालणं, धावणं की सायकल चालवणं...कोणती एक्सरसाईज ठरते सगळ्यात बेस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:28 IST2024-12-27T12:27:25+5:302024-12-27T12:28:19+5:30

Fitness Tips : आज आम्ही सांगणार आहोत की, चांगल्या आरोग्यासाठी सायकल चालवणं जास्त चांगलं की पायी चालणं की धावणं चांगलं.

Walking vs Jogging Vs Cycling which exercise is best for healthy life and fitness? | चालणं, धावणं की सायकल चालवणं...कोणती एक्सरसाईज ठरते सगळ्यात बेस्ट?

चालणं, धावणं की सायकल चालवणं...कोणती एक्सरसाईज ठरते सगळ्यात बेस्ट?

Fitness Tips : सायकल चालवणं, धावणं किंवा पायी चालणं यापैकी कोणत्याही एक्सराईजने शरीराच्या गरजेनुसार फायदे मिळतात. हृदय चांगलं ठेवण्यासाठी, वजन कंट्रोल करण्यासाठी आणि मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा विषय निघतो की, यापैकी कोणती एक्सरसाईज अधिक फायदेशीर तेव्हा कन्फ्यूजन होतं. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी यातील एकाची निवड करणं परिस्थिती आणि प्राथमिकतेवर अवलंबून असतं. आज आम्ही सांगणार आहोत की, चांगल्या आरोग्यासाठी सायकल चालवणं जास्त चांगलं की पायी चालणं की धावणं चांगलं.

पायी चालणं 

पायी चालणं हा व्यायामाचा एक नैसर्गिक आणि सोपा प्रकार आहे. ज्यामुळे गुडघ्याचं आरोग्य सुधारतं. तसेच जॉइंटमधील लवचिकपणा कायम राहण्यास मदत मिळते. गुडघ्याच्या आजूबाजूच्या मांसपेशी मजबूत होतात आणि वजन कंट्रोल करण्यासही मदत मिळते. पायी चालल्याने गुडघ्याच्या जॉइंटमध्ये चांगलं सर्कुलेशन होतं आणि लवचिकता वाढते. तसेच पायी चालल्याने हाडांचं आरोग्यही चांगलं राहतं. ब्लड सर्कुलेशन सुरळीत होत असल्यानं हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. सोबतच कॅलरी भरपूर बर्न होत असल्यानं वजन कमी करण्यासही मदत मिळते.

जॉगिंग (धावणं)

जॉगिंगनं चालणं आणि धावण्यातील गॅप कमी होतो. धावणं ही एक हाय इन्टेन्सिटी एक्सरसाईज आहे. शरीराचा स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि भरपूर कॅलरी बर्न करण्यासाठी धावणं ही एक बेस्ट एक्सरसाईज आहे. एका रिसर्चनुसार, रोज ५ ते १० मिनिटांसाठी धावल्यानं कोणत्याही आजारांपासून होणारा मृत्यू धोका कमी केला जाऊ शकतो. तसेच हृदयरोगांचा धोकाही कमी होतो. इतकंच नाही तर वजनही कमी होतं.

सायकल चालवणं

जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा तुमचे पाय पॅडलच्या संपर्कात राहतात, यावेळी जी क्रिया होते तेव्हा गुडघ्यांवर पडणारा तणाव कमी होतो. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, सायकल चालवल्याने तुमच्या गुडघ्याचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. क्लिनिकल रिहॅबिलिटेशनमध्ये प्रकाशित 2021 च्या एका रिपोर्टनुसार, सायकल चालवल्याने गुडघ्यांची जुनी ऑस्टियोआर्थरायटिसची समस्या दूर होऊ शकते आणि गुडघ्यांचं कामही सुधारतं. 

कशानं किती कॅलरी बर्न होतात?

या तिन्ही एक्सरसाईज करताना किती कॅलरी बर्न होतात, हे तुमचं वजन, वेळ आणि इन्टेन्सिटीवर अवलंबून असतं. 

- रोज साधारण ४ ते ५ किलोमीटर धावल्यानं २०० ते २५० कॅलरी प्रति तासाने बर्न होतात.

- रोज सामान्यपणे ८ ते १० किलोमीटर धावल्यानं ४०० ते ६०० कॅलरी बर्न होऊ शकतात.

- १० ते २० किलोमीटर सायकलिंग केल्यावर ४०० ते ५०० कॅलरी प्रति तास इतक्या बर्न होतात. हाय इन्टेन्सिटी सायकलिंग करत असाल तर ७०० कॅलरी प्रति तास बर्न होतात.

Web Title: Walking vs Jogging Vs Cycling which exercise is best for healthy life and fitness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.