मानवी मेंदुप्रमाणे दिसणारा हा सुकामेवा, फायदे ऐकल्यावर रोजच खाल! गंभीर आजार राहतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 05:34 PM2022-09-23T17:34:55+5:302022-09-23T17:36:52+5:30

तज्ज्ञांना असे आढळून आले की, ज्या लोकांनी लहान वयातच अक्रोड खाणे सुरू केले त्यांची शरीर रचना चांगली होती आणि त्यांना आजार होण्याची शक्यताही कमी होती.

walnut or acorod is extremely beneficial for health | मानवी मेंदुप्रमाणे दिसणारा हा सुकामेवा, फायदे ऐकल्यावर रोजच खाल! गंभीर आजार राहतील दूर

मानवी मेंदुप्रमाणे दिसणारा हा सुकामेवा, फायदे ऐकल्यावर रोजच खाल! गंभीर आजार राहतील दूर

googlenewsNext

अक्रोड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ड्रायफ्रुट आहे. प्रतिकारशक्ती मजबूत होते, हृदयविकाराच्या जोखमीपासून संरक्षण आणि मेंदू देखील तीक्ष्ण करण्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर ठरते. रोज अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय राहतो. त्यामुळे आपली पचनक्रियाही चांगली राहते.

हेल्थलाइनच्या बातमीनुसार, अक्रोडला पौष्टिक घटकांचे पॉवर हाऊस म्हटले जाते. हे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमुख स्त्रोत आहे. एका संशोधनानुसार, आपल्या निरोगी जीवनशैलीसाठी अक्रोडचे सेवन खूप महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया अक्रोड खाण्याचे फायदे.

संशोधकांच्या मते, अक्रोडाचे दररोज सेवन केल्याने शरीराची रचना आणि हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिटी हेल्थ विभागामध्ये अक्रोडावर केलेल्या संशोधनात, तज्ज्ञांनी आपल्या वयावर त्याचा कसा परिणाम होतो हे शोधण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञांना असे आढळून आले की, ज्या लोकांनी लहान वयातच अक्रोड खाणे सुरू केले त्यांची शरीर रचना चांगली होती आणि त्यांना आजार होण्याची शक्यताही कमी होती.

अक्रोडाचे सेवन केल्याने मिळणारे आरोग्य फायदे -

  • मेंदू वेगात काम करतो.
  • आपले आयुर्मान वाढण्यास मदत होते
  • अक्रोड टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी करतो
  • इतर ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत अक्रोड हे हृदयासाठी उपयुक्त मानले जाते.
  • ओमेगा 3 चा एक प्रमुख स्त्रोतदेखील आहे.


अक्रोडमध्ये पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात
अक्रोडात आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी योगदान देणारे पोषक घटक असतात. फायबर, मँगनीज, मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6, फोलेट आणि थायामिन यांसारखे पोषक घटक त्यात आढळतात.

Web Title: walnut or acorod is extremely beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.