वेट लॉस हवाय? -मग काय खाल? लो कार्ब कि लो फॅट?...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:35 PM2017-08-02T15:35:42+5:302017-08-02T15:45:10+5:30
गोंधळलात ना? मग हे वाचा आणि व्हा बारीक, स्लिम, ट्रीम आणि सुंदरही...
- मयूर पठाडे
मला जाड व्हायचंय, गलेलठ्ठ व्हायचंय, मस्त गोल गररगरीत, गोबरं होऊन सुंदर दिसायचंय... कोणाला तरी असं वाटतं का, म्हणजे जे अगदीच किरकाडे आहेत किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी किंवा कोणी अभिनेता असेल तर त्या भूमिकेची गरज म्हणून काही जणांना जाड व्हायचं असेलही, पण तसं जाड होणं कोणालाच नको असतं. आरोग्य क्षेत्रातील तज्ञ आणि डॉक्टरांचंही म्हणणं असतं, एक वेळ तुम्ही बारीक राहिलात तरी चालेल, पण गलेलठ्ठ मात्र होऊ नका..
त्यासाठीच आजकाल सर्वांचा प्रयत्न सुरू असतो. तरुणींना, स्त्रियांना तर आपल्या अंगावर एक मिलिमिटर जरी चरबी चढली किंवा साधं जेवण केलं तरी त्यांना लगेच वाटायला लागतं आपण ‘जाड’ झालो म्हणून!
लगेच मग साºयांचे ‘बारीक’ होण्यासाठीचे उपाय सुरू होतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नपाणी, खाणंपिणं जवळपास सोडून देणं! पण बारीक होण्यासाठी खरोखर काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत आणि टाळल्या पाहिजेत हे कोणाला व्यवस्थित माहित असतं?
तुम्हीच सांगा बरं, तुम्हाला बारीक व्हायचं असेल तर तुम्ही काय कराल?
कोणी म्हणेल, जेवण कमी करायचं, कोणी सांगेल फक्त फळांच्या रसावर राहायचं, कोणी सांगेल सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी करायचं, कोणी म्हणेल, ग्रीन टी प्या, गरम लिंबू पाणी प्या.. ज्याला जे वाट्टेल ते तो सांगेल. सांगतोही..
पण खरं काय?
बारीक व्हायचं असेल आणि त्याचे साइड इफेक्टसही तुम्हाला नको असतील तर आपल्या आहारातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण तुम्हाला कमी करावं लागेल.
पण त्यातही आणखी उपप्रश्न.
आपल्या आहारातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करायचं की फॅट्सचं.. म्हणजे चरबीचं?
दोन्हीही गोष्टी कमी किंवा प्रमाणात असल्या पाहिजेत, पण त्यातही कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी केल्यानं जास्त फायदा होतो.
कसा?
कार्बोहायड्रेट्स कमी केल्यानं काय फायदा होतो?
१- पहिली गोष्ट म्हणजे शरीरातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी झालं तर आपली भूकही मंदावते. त्यामुळे सडपातळ होण्यास आपल्याला मदत होते!
२- तुमच्या शरीरात जाणाºया कॅलरीजचं प्रमाणही कमी होतं.
३- लो कार्बोहायड्रेट्सच्या आहाराचा केवळ इतकाच फायदा नाही, तुमच्या शरीरातील अतिरिक्त साखरेचं प्रमाणही त्यामुळे कमी होतं.
४- तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर ते कमी होऊन नॉर्मलवर येतं.
५- तुमच्या शरीरातील गुड कोलेस्टोरॉलचं प्रमाण वाढतं आणि ते तुमच्या हृदयासाठीही चांगलं असतं.
आपल्याला किती कार्बोहायड्रेट्सची गरज असते?
* तसं म्हटलं तर त्याला काही नियम नाही.
* आपलं वय काय, लिंग काय, आपलं बॉडी कम्पोझिशन कसं आहे, रोजची अॅक्टिव्हिटी कशी आहे, आपला पर्सनल चॉइस काय आहे, अशा अनेक गोष्टी त्यावर अवलंबून आहेत.
* ज्यांची प्रकृती हेल्दी आहे, जे जास्त व्यायाम, कष्याची कामं करतात, त्यांना मात्र तुलनेनं जास्त कार्बोहायड्रेट्सची गरज असते..
आता कळलं, वजन कमी करायचं, स्लिम, ट्रीम व्हायचं तर काय करायचं ते?..