धुम्रपान सोडायचंय? ‘सोडू’ काही नका, फक्त या गोष्टी खा..
By admin | Published: June 20, 2017 03:56 PM2017-06-20T15:56:19+5:302017-06-20T15:56:19+5:30
..ज्या खाऊ नयेत, असंच आजवर तुम्हाला सांगितलं गेलंय!
- मयूर पठाडे
धुम्रपान करणाऱ्यांना कितीही सांगा, अरे धुम्रपान करू नका, आरोग्यासाठी ते फारच घातक आहे, तुमच्या शरीराचं ते खोकडं करून टाकील आणि कॅन्सरसारख्या खतरनाक आजाराची शक्यता बळावून तुमची इहलोकीची यात्राही हे धुम्रपान केव्हाही संपवून टाकील.. आता धुम्रपान करणाऱ्यांना हे काही माहीत नाही, असं थोडीच आहे? पण धुम्रपानाची त्यांची लत सुटता सुटत नाही, हे त्यांची मुख्य समस्या आहे.
वेगवेगळे औषधं घेण्यापासून तर नित्यनेमानं संकल्प करूनही ही सवय काही सुटता सुटत नाही, हाच सगळ्यांचा अनुभव आहे.
पण धुम्रपान करणाऱ्यांना ही सवय सोडण्यासाठी आता त्यातल्या त्यात सोपा मार्ग आता उपलब्ध झाला आहे. खाण्यापिण्याची काही बंधनं पाळली.. खरं तर खाण्यापिण्यावर बंधनं घालण्यापेक्षा काही गोष्टींचं जर तुम्ही सेवन केलं, तर तुमची धुम्रपान सुटण्याची शक्यता बऱ्याच अंशी वाढू शकते. अर्थात त्यासाठी तुमच्या मनाचा निग्रहही हवाच.
एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या गोष्टींचं सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या..
धुम्रपानाच्या सवयीपासून सुटण्यासाठी काय कराल?
४- च्युर्इंगमदेखील धुम्रपान सोडण्यासाठी मददगार ठरू शकतं. च्युर्इंगममुळे आरोग्यावर काही विपरित परिणाम होत नाहीत, पण याच च्युर्इंगममुळे धुम्रपान करण्याची तुमची लहर कमी होते.
५- चॉकलेटदेखील धुम्रपानाचा तुमचा पिच्छा सोडवू शकतं. यासाठी डार्क चॉकलेट चांगलं मानलं जातं. मिल्क चॉकलेट मात्र धुम्रपान सोडण्यासाठी उपयोगी ठरत नाही, असंही अभ्यासकांचं म्हणणं आहे.
एक गोष्ट मात्र पुन्हा लक्षात घ्या, ज्या गोष्टी खाण्याचा सल्ला धुम्रपानापासून मुक्ती मिळवण्यासाठी दिला आहे, त्याचं अतिरेकी सेवन मुळीच करु नका आणि तत्पूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्लाही अवश्य घ्या.