टाइप २ डायबिटीजपासून बचाव करायचाय? लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 10:39 AM2019-03-07T10:39:50+5:302019-03-07T10:40:07+5:30

बदलत्या लाइफस्टाइलमध्ये वेगवेगळ्या आजारांसोबतच डायबिटीज हा आजार देखील कमी वयातच अनेकांना आपल्या जाळ्यात घेत आहे.

Want to stay away and protected from type 2 diabetes change in lifestyle is necessary | टाइप २ डायबिटीजपासून बचाव करायचाय? लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल

टाइप २ डायबिटीजपासून बचाव करायचाय? लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल

Next

बदलत्या लाइफस्टाइलमध्ये वेगवेगळ्या आजारांसोबतच डायबिटीज हा आजार देखील कमी वयातच अनेकांना आपल्या जाळ्यात घेत आहे. मात्र एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, व्हिटॅमिन सी असलेला आहार घेतला तर डायबिटीजच्या रुग्णांमध्ये दिवसभरात वाढलेली ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शोधात हेही आढळलं आहे की, व्हिटॅमिन सी टाइप-२ डायबिटीज असलेल्या रुग्णांमध्ये रक्तदाब कमी करतं, ज्यामुळे हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.  

कसा मॅनेज कराल डायबिटीज?

शारीरिक हालचाल, पोषक आहार, डायबिटीजची औषधे आणि काळजी घेणे हे डायबिटीज मॅनेजमेंटसाठी महत्त्वपूर्ण आहे. इथे लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे भारतात डायबिटीजने पीडित २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्रत्येक ४ पैकी एका व्यक्तीला डायबिटीज असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. टाइप २ डायबिटीज असलेल्या व्यक्तीच्या शरीरात इंसुलिनचा योग्य वापर होऊ शकत नाहीय. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवता येत नाही. 

यामुळेही डायबिटीजचा धोका अधिक

टाइप २ डायबिटीजची कारणे काय आहेत? आणि हा का होतो? याचं काही ठोस उत्तर नाहीये. काही लोकांना हा आजार आनुवांशिक रूपाने होतो. ज्या लोक जाड आहेत, त्यांच्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यात इंसुलिनचा उपयोग करण्याच्या क्षमतेवर दबाव वाढतो. याने टाइप २ डायबिटीज होऊ शकतो. ज्या व्यक्तीच्या शरीरात जितके जास्त फॅट असलेले टिशू असतात, त्यांच्या कोशिका तितक्याच अधिक प्रतिरोधी असतात. 

हळूहळू विकसित होतात लक्षणे

लाइफस्टाइलही यात प्रमुख भूमिका बजावत असते. टाइप २ डायबिटीजची लक्षणे वेळेनुसार हळूहळू विकसित होतात. त्यातील काही तहान आणि भूक वाढणे, पुन्हा पुन्हा लघवी लागल्यासारखे होणे, वजन कमी होत जाणे, थकवा, दृष्टी कमी होणे, संक्रमण आणि जखमा कमी वेगाने भरणे तसेच काही भागांवर त्वचा काळी पडणे यांचा समावेश आहे. कमी पोषक तत्त्व असलेल्या भोजनाच्या व्यापक उपलब्धतेमुळेही टाइप २ डायबिटीजमध्ये वाढ होत आहे. भाज्या, फळं, धान्य अशा पोषक आहाराचा टाइप २ डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी समावेश करायला हवा. 

डायबिटीजपासून दूर राहण्याचे उपाय

- व्यायाम नियमित करा. व्यायामाचे वेगवेगळे फायदे होतात. याने वजन नियंत्रणात राहतं, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते आणि इतरही फायदे होतात. प्रत्येक दिवशी कमीत कमी ३० मिनिटे शारीरित हालचाल करण्याचे अनेक फायदे होतात. 

- पोषक आहार घ्यावा. पोष्टीक कडधान्य, फळं आणि भाज्यांचा आहारात भरपूर समावेश करणे फायदेशीर ठरेल. याने तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही प्रोसेस्ड आणि रिफाइंड फूड खाणार नाहीत. 

- मद्यसेवन कमी करा आणि धुम्रपान बंद करा. फार जास्त मद्यसेवन केल्याने वजन वाढतं. याने ब्लड प्रेशरन आणि ट्रायग्लिसराइडचा स्तरही वाढतो. तर धुम्रपान करणाऱ्यांना धुम्रपान न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत मधुमेह होण्याचा दुप्पट धोका असतो. त्यामुळे धुम्रपान सोडून द्यावे.

(टिप: आम्ही केवळ ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातील कोणत्याही गोष्टीचा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. त्याशिवाय काहीही करणे महागात पडू शकते.)

Web Title: Want to stay away and protected from type 2 diabetes change in lifestyle is necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.