अनिमियापासून बचाव करायचा असेल तर या गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 09:36 AM2018-09-07T09:36:56+5:302018-09-07T09:37:03+5:30
अॅनिमिया हा शब्द अनेकांनी अनेकदा ऐकला असेल. पण याचा नेमका अर्थ फार लोकांना माहीत नसतो.
अॅनिमिया हा शब्द अनेकांनी अनेकदा ऐकला असेल. पण याचा नेमका अर्थ फार लोकांना माहीत नसतो. अॅनिमिया म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झाल्याने येणारा अशक्तपणा. अशक्तपणा हा रक्तातील लाल पेशी म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झाल्याने येतो. जर शरीरात कमी आणि असामान्य हिमोग्लोबिन कमी होतो तेव्हा शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. या कारणाने थकवा जाणवतो. महिला आणि लहान मुला-मुलींमध्ये तसेच बऱ्याच काळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती कमी होते आणि अशक्तपणा सहजपणे आपल्याला त्याच्या कचाट्यात घेतो.
अॅनिमियाची लक्षणे
थकवा, कमजोरी, त्वचा पिवळी पडणे, हृदयाचे ठोके असामान्य होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, छातीत दुखणे, हात आणि पाय थंड पडणे, डोकेदुखी.
कशामुळे होतो अॅनिमिया?
१) जर तुम्ही चांगला आहार घेत नसाल आणि आहारात आयर्न, व्हिटॅमिन बी १२ आणि फोलेट कमी असेल तर अॅनिमिया होण्याची शक्यता अधिक असते.
२) जर तुम्ही गर्भवती असाल आणि फोलिक अॅसिडसोबत मल्टीव्हिटॅमिन घेत नसाल तर अॅनिमिया होण्याचा धोका असतो.
३) जर फार जास्त काळापासून कॅन्सर, किडनीचा आजार किंवा आणखीही कोणता आजार असेल तर अॅनिमिया होण्याची धोका असतो. कारण या आजारांमुळे लाल रक्तपेशी कमी करणे हा असतो.
४) जर तुमच्या परिवारात अनेक वर्ष सर्वांनाच अॅनिमिया होत आला असेल तर तुम्हाला सिकल सेल अॅनिमिया होऊ शकतो.
यापासून बचावासाठी काय खावे?
पालक : पालकमध्ये कॅल्शिअण, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी९, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, आयर्न, फायबर, बीचा कॅरोटीन असतात जे शरीराला निरोगी ठेवतात.
सोयाबीन : सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आणि प्रोटीन असतात. हे पोषक तत्व लाल रक्तपेशींची निर्मिती करण्यास मदत करतात.
टोमॅटो : टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन असतात, जे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात.
अंडी : अंड्यांमध्ये प्रोटीन आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. याने शरीराला व्हिटॅमिन मिळतात.
डाळिंब : डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयर्न अधिक प्रमाणात आढळतात. याने शरीराचा रक्तप्रवाह आणि अॅनिमीयाची लक्षणे जसे की, चक्कर येणे, थकवा आणि ऐकण्यास त्रास होणे यापासून सुटका मिळते.
मध : कॉपर आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असलेल्या मधामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचा स्तर वाढण्यास मदत मिळते. मध लिंबू पाण्यासोबत सेवन केल्यास अॅनिमिया ग्रस्त रुग्णाला फायदा होतो.