चमत्कार बघायचाय? फक्त 30 मिनिटे मोबाइल दूर ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 06:02 AM2023-12-19T06:02:54+5:302023-12-19T06:03:02+5:30
मानसिक आरोग्य सुधारण्यासह नोकरीत मिळतेय समाधान
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडिया वापरण्याची सवय प्रत्येकाला इतकी लागली आहे की, यामुळे त्याचा आपल्या कामात ताण, सतत भीती आणि चिंता वाढत आहे. सोशल मीडियाचा वापर केवळ ३० मिनिटांपर्यंत जरी कमी केला तर मानसिक आरोग्य सुधारण्यास; तसेच नोकरीत समाधान मिळण्यास मदत होत असल्याचे एका नव्या अभ्यासात समोर आले आहे.
जर्मनीचे ‘रुर’ विद्यापीठ आणि ‘जर्मन सेंटर फॉर मेंटल हेल्थ’ने हा अभ्यास केला असून, तो ‘बिहेवियर ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर्नल’मध्ये प्रकाशित झाला आहे.
संशोधनात काय आढळले?
अभ्यासासाठी, संशोधकांनी १६६ लोकांना सहभागी करून घेतले. सहभागी सर्व नोकरी करणारे होते आणि ते दररोज सोशल मीडियावर किमान ३५ मिनिटे घालवत होते.
इतक्या कमी कालावधीतही, आम्हाला आढळले की जे लोक सोशल मीडियावर दिवसातून ३० मिनिटांपेक्षा कमी वेळ घालवतात त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये आणि नोकरीतील समाधानामध्ये सुधारणा होते, असे अभ्यासात म्हटले आहे.
२ तास ५० मिनिटांमध्ये अधिक वेळ दररोज भारतीय सोशल मीडियावर घालवतात.
४६.७ कोटी भारतीय सोशल मीडियावर व्यस्त आहेत.
१८ ते ३५ वर्षांतील मुले सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आहेत.
२९ तास १२ मिनिटे प्रत्येक जण महिन्यात यू-ट्यूब पाहतो.
दररोज आपण काय करतो?
इंटरनेटवर सर्च ६ तास २३ मिनिटे
टीव्ही पाहणे ३ तास २८ मिनिटे
सोशल मीडियावर २ तास ५० मिनिटे
बातम्या वाचणे ३ तास १२ मिनिटे
गाणी ऐकणे २ तास २२ मिनिटे
रेडिओ ऐकणे ५३ मिनिटे
पॉडकास्ट ऐकणे १ तास ३४ मिनिटे
गेम खेळणे १ तास ४१ मिनिटे
सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक, एफबी मेसेंजर, एक्स (ट्टिटर), स्नॅपचॅट