पोट फुगण्याची समस्या झटक्यात होईल दूर, न्यूट्रिशनिस्टने सांगितले काही सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 10:16 AM2024-11-19T10:16:09+5:302024-11-19T10:16:39+5:30
Bloating Home Remedies : चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल अनेकांना ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
Bloating Home Remedies : चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल अनेकांना ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. काही खाल्ल्यावर किंवा जेवण केल्यावर सामान्यपणे ही समस्या होते. खाल्लेलं अन्न व्यवस्थित न पचल्याने, घाई-घाईने खाल्ल्याने, तेलकट खाल्ल्याने, एकत्र खूप जास्त काही खाल्ल्याने, मसालेदार काही खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या होते. त्यामुळे अस्वस्थ जाणवू लागतं. अशात यावर काय उपाय कराल याचा सल्ला न्यूट्रिशनिस्टनी दिला आहे.
न्यूट्रिशनिस्ट सिमरन चोप्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी पोट फुगण्याची समस्या दूर करण्याचे काही उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊ काय आहेत हे उपाय...
ब्लोटिंगची समस्या दूर करण्याचे उपाय
लिंबू - लिंबू नॅचरल डाउयुरेटिक्स आणि जेंटल लॅक्सेटिव्ससारखं काम करतं यामुळे लिंबाचा रस पाण्यात टाकून प्यायल्याने फ्लूइड इंटेक वाढतं. याने तुमची पोट फुगण्याची, गॅसची आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या अनेकदा बद्धकोष्ठता किंवा गॅसमुळेही होते.
बडीशेप - बडीशेप खाऊन तुम्ही पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करू शकता. यात असे काही तत्व असतात जे इन्फ्लेमेशन, गॅस आणि ब्लोटिंगचं कारण बनवणाऱ्या बॅक्टेरियाना नष्ट करतात. तुम्ही बडीशेप अशीही खाऊ शकता किंवा बडीशेपचं पाणीही पिऊ शकता.
अननस - अननसामध्ये डायजेस्टिव एंझाइम ब्रोमलेन असतं जे ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. अननसाचा मधला भाग बारीक करून याचा रस सेवन करावा.
पालक - ब्लोटिंगची समस्या ब्लोटिंगची समस्या होत असेल तर पालकाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पालकमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असतं जे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यास मदत करतात.