गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 03:20 PM2022-09-05T15:20:37+5:302022-09-05T15:20:47+5:30

Warm Water Effects : नेहमीच महिला वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात. पण वजन कमी करण्याची ही पद्धत योग्य कशी आहे अनेकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊ याचे फायदे...

Warm water effectiveness in reduce belly fat benefits, you should know this | गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या काय आहे सत्य

गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या काय आहे सत्य

googlenewsNext

Warm Water Effects : वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही लोक जेवण सोडतात तर काही लोक डाएटमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतात. आजकाल बेली फॅट कमी करण्यासाठी वर्कआउट आणि जिममध्ये जाण्याचाही ट्रेन्ड आहे. पण वजन कमी करण्याची सर्वात लोकप्रिय पद्धत म्हणजे गरम पाणी. नेहमीच महिला वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात. पण वजन कमी करण्याची ही पद्धत योग्य कशी आहे अनेकांना माहीत नसतं. चला जाणून घेऊ याचे फायदे...

गरम पाणी पिण्याचे फायदे

पाणी आरोग्यासाठी फार महत्वाचं असतं. गरम पाणी शरीराला डिटॉक्स करून विषारी पदार्थ बाहेर काढतं. यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्मही चांगलं होतं आणि याने भूक कमी लागते. जर जेवण केल्यावर गरम पाणी प्यायलात तर याने पचनक्रिया चांगली होते. तसेच पचनसंबंधी समस्या जसे की, बद्धकोष्टता, अॅसिडीटी आणि अपचन अशा समस्या दूर होतात.

कधी प्यावं गरम पाणी?

गरम पाणी तुम्ही रिकाम्या पोटी किंवा जेवण केल्यानंतर दोन्ही प्रकारे पिऊ शकता. याने वजन कमी करण्यास फायदा मिळेल असं मानलं जातं. जर रोज सकाळ गरम पाणी प्यायलात तर याने फॅट बर्न करण्यास मदत मिळते. जेवण केल्यावर गरम पाणी प्यायल्याने पचन चांगल्या प्रकारे होतं आणि फॅट कंट्रोल होतं. जर रोज सकाळी कोमट पाणी प्यायलात तर बेटी फॅट म्हणजे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते.

गरम पाण्याचे नुकसान

1) जास्त गरम पाणी प्यायल्याने नसांमध्ये सूज येण्याची समस्या होऊ शकते. याने अनेकदा मेंदूच्या नसाही प्रभावित होतात आणि डोकेदुखी समस्या होऊ लागते. त्यामुळे कोमट पाण्याचं सेवन करावं.

2) गरम पाणी प्यायल्याने बॉडी डिटॉक्स होते. पण प्रमाणापेक्षा जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीवरही दबाव पडतो. यामुळे किडनी डॅमेज होण्याचीही शक्यता असते.

3) जास्त गरम पाणी प्यायल्याने ब्लड वेलेल्स म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि हे नुकसानकारक ठरू शकतं.

Web Title: Warm water effectiveness in reduce belly fat benefits, you should know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.