रोज ४ तासांपेक्षा जास्त टीव्ही बघितल्याने होते ही गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध नाही तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 05:15 PM2022-01-21T17:15:10+5:302022-01-21T17:15:48+5:30
TV watching linked with potentially fatal blood clots : या रिसर्चनुसार, रोज अडीच तासांच्या तुलनेत चार तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही बघितल्याने शरीरात ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका ३५ टक्के वाढतो.
TV watching linked with potentially fatal blood clots : जास्त वेळ टीव्ही बघण्याचे नुकसान नेहमीच सांगितले जातात. पण आता ब्रिटनच्या एका रिसर्चमधून आणखी जास्त धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिसर्चनुसार, रोज अडीच तासांच्या तुलनेत चार तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही बघितल्याने शरीरात ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका ३५ टक्के वाढतो. या रिसर्चचा निष्कर्ष यूरोपियन जर्नल ऑफ प्रिवेंटिव कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे.
ब्रिटनची यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलच्या रिसर्चर्सकडून करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये ४० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या १ लाख ३१ हजार ४२१ लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. ज्यांना व्हीटीआयची समस्या नव्हती. रिसर्चमध्ये टीव्ही बघणे आणि व्हीटीआय म्हणजे वेनस थ्रोबेबोलिज्म यांच्यातील संबंधाचं निरीक्षण करण्यात आलं. व्हीटीआयमध्ये पल्मोनरी इंबोलिज्म म्हणजे फुप्फुसात ब्लडच्या गाठी आणि ब्रेन थ्रोंब्रोसिस यांचा समावेश असतो. वेन थ्रोंबोसिसमध्ये नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका असतो आणि हा धोका फुप्फुसांपर्यंत पोहोचू शकतो. ज्यामुळे पल्मोनरी इंबोलिज्मचा धोका निर्माण होतो.
यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलने केलेल्या या रिसर्चचे मुख्य लेखक डॉ. सेटर कुनट्सर यांच्यानुसार, आमच्या रिसर्चच्या निष्कर्षाने असंही सुचवलं आहे की, शारीरिक रूपाने अॅक्टिव राहिल्यानंतरही जास्त वेळ टीव्ही बघितल्याने रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका दूर केला जाऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हाही टीव्ही बघाल तेव्हा मधे मधे ब्रेक घेत रहा. अर्ध्या तासानंतर ब्रेक घेऊन उभे रहा आणि स्ट्रेचिंग करा. टीव्ही बघताना जंक किंवा फास्ट फूड इत्यादींचं सेवन अजिबात करू नका.
वैज्ञानिकांनी जास्त वेळ टीव्ही बघणाऱ्यांच्या तुलने कधीही नाही आणि कधी कधी टीव्ही बघणाऱ्यांमध्ये व्हीटीई विकसीत करण्यासंबंधी धोक्याचं विश्लेषण केलं आहे. त्यांना आढळलं की कधीच टीव्ही न बघणाऱ्यांच्या तुलनेत जास्त वेळ टीव्ही बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये व्हीटीई विकसीत होण्याची शक्यता १.३५ टक्के अधिक होती.