'हे' गंभीर नुकसान वाचाल तर पुन्हा कधीच उभे राहून पिणार नाही पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:34 AM2024-07-22T10:34:23+5:302024-07-22T10:35:01+5:30

Water Drinking Tips : बरेच लोक उभं राहून गटा गटा पाणी पितात. पण असं करणं खरंच योग्य असतं का? हे किती नुकसानकारक आहे हे अनेकांना माहीत नसतं. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Water Drinking Tips : Side effects of drinking water while standing | 'हे' गंभीर नुकसान वाचाल तर पुन्हा कधीच उभे राहून पिणार नाही पाणी!

'हे' गंभीर नुकसान वाचाल तर पुन्हा कधीच उभे राहून पिणार नाही पाणी!

Water Drinking Tips : पाणी पिणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे तुम्हाला माहीत आहेच. सगळेच लोक रोज पाणी पिपात. पण पाणी पिण्याची योग्य पद्धत अनेकांना माहीत नसते. पाणी योग्य पद्धतीने प्यायले नाही तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. बरेच लोक उभं राहून गटा गटा पाणी पितात. पण असं करणं खरंच योग्य असतं का? हे किती नुकसानकारक आहे हे अनेकांना माहीत नसतं. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उभं राहून पाणी प्यायल्याने इसोफेगसवर दबाव पडतो, पाणी वेगाने पोटात आणि मग ओटी पोटात पोहोचतं. यामुळे आपल्या पचन तंत्रावर वाईट परिणाम होतो. आयुर्वेदातही उभं राहून पाणी पिण्याला नुकसानकारक सांगितलं आहे. डॉक्टरही नेहमीच बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात.

बसून पाणी पिण्याचे फायदे!

पाणी पिण्यासाठी बसण्याची पोजिशन सर्वात योग्य आहे. अशाप्रकारे पाणी प्यायलात तर पचन योग्यप्रकारे होतं. जेव्हा कुणी बसून पाणी पितं तेव्हा ते आपल्या शरीरातील कोशिकांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचतं. पाणी कोशिकांपर्यंत पोहोचून टॉक्सिन शरीरातून बाहेर काढतं. तसेच पाण्याचं अवशोषण चांगल्याप्रकारे झालं तर रक्तही साफ होतं. शरीर फीट राहतं.

किडनीची समस्या

उभं राहून पाणी पिणं आपल्या किडनीसाठी नुकसानकारक आहे. कारण उभं राहून पाणी पिलात तर ते ब्लड सेल्सपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचत नाही आणि रक्तात विषारी पदार्थ वाढतात. किडनी रक्तातील विषारी आणि अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्यासाठी लघवी तयार करते. जास्त अशुद्धी असल्याने किडनीचं काम वाढतं. त्यामुळे किडनीसंबंधी समस्या होऊ शकतात.

पचनक्रिया प्रभावित होते

उभं राहून पाणी प्यायल्याने डायजेशन सिस्टीमला नुकसान पोहोचतं. याने ग्रासनळीत समस्या होऊ शकते. अॅसिडीटी आणि अपचनाची समस्या होऊ शकते. बसून पाणी प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम मजबूत राहते. याने पचनासंबंधी समस्या होत नाहीत.

श्वसनावर वाईट परिणाम

उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या अन्ननलिकेवर परिणाम होतो. उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या श्वासनलिकेत ऑक्सिजन योग्यप्रकारे पोहोचू शकत नाही. त्यामुळे श्वसन तंत्र आणि फुप्फुसांवर वाईट प्रभाव पडतो. याने हार्ट प्रॉब्लेम होण्याचीही शक्यता असते.

संधीवाताची समस्या

उभं राहून पाणी प्यायल्याने पाण्याचं प्रेशर पोटाच्याही खाली जाऊन थांबतं. ज्यामुळे हाडं आणि जॉइंट्सवर वाईट परिणाम होतो. सोबतच हाडे कमजोर होणं सुरू होतं. अशात कमजोर हाडांमुळे संधिवातसारखी समस्या होण्याचीही शक्यता असते.

Web Title: Water Drinking Tips : Side effects of drinking water while standing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.