डाएट नाही तर १ ग्लास पाण्याने कमी करा वजन, जाणून घ्या कसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:13 PM2018-10-26T12:13:42+5:302018-10-26T12:14:31+5:30

जेव्हा वजन कमी करण्याचा मुद्दा येतो तेव्हा डाएट आणि एक्सरसाइज हा मंत्र सर्वांना सांगितला जातो. वजन कमी करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे.

Water is good resource for weight loss | डाएट नाही तर १ ग्लास पाण्याने कमी करा वजन, जाणून घ्या कसे!

डाएट नाही तर १ ग्लास पाण्याने कमी करा वजन, जाणून घ्या कसे!

Next

जेव्हा वजन कमी करण्याचा मुद्दा येतो तेव्हा डाएट आणि एक्सरसाइज हा मंत्र सर्वांना सांगितला जातो. वजन कमी करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. कारण याचे तसे काही साइड इफेक्ट नाहीत. एका आरोग्यादायी डाएटमध्ये हेही महत्त्वाचं असतं की, दिवसभरात तुम्ही किती प्रमाणात पाणी पिता. वजन कमी करण्याच्या प्रमुख तत्वांमध्ये पाणी आहे. पण याचा लगेच प्रभाव होते असे नाही. जर कुणी सतत वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असेल आणि योग्य प्रमाणात किंवा योग्य पद्धतीने पाणी पित नसेल तर वजन कमी करणे कठीण आहे. 

काय सांगतो रिसर्च?

जेवण करण्याच्या काही वेळेआधी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. कारण याने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल आणि त्यामुळे जेवण करताना खाल्लंही कमी जाईल. एका शोधातून समोर आलं आहे की, जेवण करण्याच्या काही वेळेआधी जे लोक पाणी पितात ते जेवताना आहारातून ७५ टक्के कमी कॅलरी घेतात. जर दररोज ७५ टक्के कॅलरी कमी कॅलरी घेतल्या तर वर्षभरात ते लोक २७३७५ कॅलरी कमी घेतील. याने जवळपास ४ किलो वजन कमी होईल. तेही कोणताही त्रास न घेता.  

लवकर होतं पचन

किडनीचं कार्य योग्य प्रमाणात चालण्यासाठी पाणी आवश्यक तत्व आहे. आणि याने किडनी स्टोनचा धोकाही कमी होतो. सोबतच योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने पचनक्रियाही चांगली होते. 

याचाही होतो फायदा

जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएटवर असाल, तर तुम्ही किती कॅलरी घेत आहात यावर लक्ष ठेवा. केवळ खाद्यपदार्थांवरच नाही तर कोणत्या पदार्थातून किती कॅलरी मिळत आहेत हेही बघा. 

ब्लॅक कॉफी - कॉफीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतं. ब्लॅक कॉफीला कॅलरी फ्री मानलं जातं. 

ग्रीन टी - ग्रीन टी सुद्धा अॅंटी-ऑक्सिडेंटचं स्त्रोत मानली जाते. याने वजन कमी करण्यास मदत मिळते. 

फळांचा  ज्यूस - जर तुम्ही डबाबंद ज्यूस घेत असाल तर त्याच्या पॅकेटवर लिहिलेल्या सूचना वाचायला हव्यात फ्रूट ज्यूसमध्ये शुगरचं प्रमाण अधिक असतं आणि यात कॅलरीजचं प्रमाणही अधिक असतं. 

भाज्यांचा  ज्यूस - फळांच्या ज्यूसपेक्षा भाज्यांचा ज्यूस जास्त फायदेशीर ठरतो. कारण यात कॅलरीचं प्रमाण कमी असतं. आणि फायबर अधिक प्रमाणात असतं. 
 

Web Title: Water is good resource for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.