पाणी हे जीवन;पण किती प्यावे दिवसभरात?बघा तज्ज्ञ काय सांगतात....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:30 PM2021-05-31T17:30:13+5:302021-05-31T17:31:44+5:30

बरेचदा सांगितले जाते की भरपूर पाणी पित रहा. त्यामुळे अनेक रोग दूर पळून जातात. मात्र, दिवसभरात पाणी प्यायला पाहिजे याला मर्यादा आहेत का?

Water is life; but how much to drink in a day? See what experts say .... | पाणी हे जीवन;पण किती प्यावे दिवसभरात?बघा तज्ज्ञ काय सांगतात....

पाणी हे जीवन;पण किती प्यावे दिवसभरात?बघा तज्ज्ञ काय सांगतात....

googlenewsNext

पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाणी आपल्या शरीराच्या प्रत्येक कार्यात महत्वाची भूमिका बजावते. उन्हाळ्यात गर्मी वाढल्याने आपल्याला सतत तहान लागत राहते व आपण सतत पाणी पित राहतो.  असे बरेचदा सांगितले जाते की भरपूर पाणी पित रहा. त्यामुळे अनेक रोग दूर पळून जातात. मात्र, दिवसभरात पाणी प्यायला पाहिजे याला मर्यादा आहेत का? याबाबत डॉक्टरांनी, तज्ज्ञ मंडळींनी मर्यादा आखून दिलेली आहे. विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊन आपण पाणी पित राहिलो तर ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणजे पाणी हे उपायकारी ठरण्याऐवजी ते अपायकारी ठरू शकेल. म्हणूनच पाणी पितानाही पुरेशी काळजी घ्या. 

शरीरासाठी किती पाणी पिणे आवश्यक?
यूएस नॅशनल अ‍ॅकेडमिक्स ऑफ सायन्स, इंजीनियरिंग आणि मेडीसिननुसार, एका महिलेच्या शरिरात दररोज ११.५कप पाणी जाणे आवश्यक आहे. ११,५ कप म्हणजेच साधारण २.७ लिटर पाणी. तर एखाद्या पुरुषाला १५.५ कप पाण्याची आवश्यकता असते. याचा अर्थ दिवसभरात पुरुषाच्या शरीरासाठी जवळपास ३.७ लिटर पाण्याची आवश्यकता असते. म्हणजेच काय, तर याच मर्यादेनुसार महिला वा पुरुषाने पाणी प्यायला हवे. ही मर्यादा ओलांडली तर पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जे पाणी आपल्या शरिरातील व्याधी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते, ते पाणी मर्यादेपेक्षा अधिक प्यायला मिळाल्यामुळे नको त्या व्याधींना निमंत्रण देऊ शकते. आपल्या शरीरात पाण्याची काही प्रमाणात मात्रा ही ज्यूस आणि जेवणातून पूर्ण होते. आपण पाण्याची २० टक्के आवश्यकता ही आपल्या नियमित जेवणातूनच पूर्ण करतो.

पाण्याची आवश्यकता खालील गोष्टीवर अवलंबून
वर नमूद केलेली पाण्याची आवश्यकता ही प्रत्येक माणसाच्या शरिरासाठी सारखीच असेल, असे नाही. प्रत्येकाचे शरिर वेगळे असते, त्यानुसार प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असते की त्या व्यक्तीला पाण्याची किती गरज आहे. व्यक्तीचे खाणेपिण्याचे पदार्थ, त्याची जीवनशैली, वातावरणीय गोष्टी यावरदेखील पाण्याची आवश्यकता अवलंबून असते. एका अहवालानुसार, तुम्ही कुठे राहता, तुम्ही किती तापमानात राहता, तुमच्या भोवतालचे वातावरण कसे आहे, तुम्ही किती अ‍ॅक्टिव्ह आहात, तुमचे आरोग्य, प्रेग्नन्सी आदी गोष्टींवरही पाण्याची गरज अवलंबून असते. 

जास्त पाणी पिणे धोकादायक
गरजेपेक्षा अधिक पाणी पिण्याने आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारचे परिणाम होतात. एका अहवालांनुसार, जास्त पाणी पिण्याने शरीरातील सोडियमच्या प्रमाणावर परिणाम होतो. इलेक्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे डायबिटीज, ह्रदयाशी संबंधित विकार तसेच हार्मोन्सवर परिणाम होण्याची भिती असते. त्यामुळे शरिराच्या गरजेनुसारच पाणी प्या, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

Web Title: Water is life; but how much to drink in a day? See what experts say ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.