उन्हाळ्यात योग्य पद्धतीने खावं कलिंगड, नाही तर होऊ शकते समस्या; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 05:21 PM2023-05-18T17:21:40+5:302023-05-18T17:22:38+5:30

Health Tips : अनेक एक्सपर्ट सांगतात की, कलिंगड, खरबूज, काकडी अशी फळं आहेत जे शरीराला थंड आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त सेवन कलिंगडाचं केलं जातं.

Watermelon eating tips in summer, know the right way | उन्हाळ्यात योग्य पद्धतीने खावं कलिंगड, नाही तर होऊ शकते समस्या; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

उन्हाळ्यात योग्य पद्धतीने खावं कलिंगड, नाही तर होऊ शकते समस्या; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

googlenewsNext

Health Tips :  सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. उन्हापासून वाचण्यासाठी, पोटाला थंडावा मिळावा म्हणून वेगवेगळी थंड फळं खाल्ली जातात. ज्या फळांमध्ये भरपूर पाणी असतं अशी फळं जास्त खाल्ली जातात. या फळांमुळे हायड्रेट राहण्यासही मदत मिळते. उन्हाळ्यात मिळणाऱ्या जास्तीत जास्त फळांमध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअमसारखे पोषक तत्व असतात. पण या फळांचं सेवन योग्य पद्धतीने केलं गेलं नाही तर याने शरीराला नुकसानही पोहोचू शकतं.

अनेक एक्सपर्ट सांगतात की, कलिंगड, खरबूज, काकडी अशी फळं आहेत जे शरीराला थंड आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त सेवन कलिंगडाचं केलं जातं. कलिंगड खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळते. कारण यात भरपूर पाणी आणि इतर पोषक तत्व असतात. पण कलिंगड खाण्याचे काही नियम आहेत जे फॉलो केले पाहिजे.

- बाजारातून आणलेलं कलिंगड लगेच खाऊ नका, ते आणल्यावर काही वेळ पाण्यात टाकून ठेवा.

- जर तुम्हाला लिव्हरची समस्या असेल तर रिकाम्या पोटी कलिंगड अजिबात खाऊ नका.

- कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण यातच भरपूर पाणी असतं.

- रात्री कलिंगडाचं सेवन करू नये. रात्री कलिंगड पचवणं अवघड जातं. त्यामुळे आतड्यांमुळे जळजळही होऊ शकते.

- कलिंगड हे नाश्ता केल्यावर खाण्याचा सल्ला दिला जातो. हे रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक नुकसान होऊ शकतात. 

- कलिंगड खाण्याची योग्य वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेदरम्यानची आहे. तर कधी कधी सायंकाळी 5 वाजताआधी खायला हवं.

काय मिळतात फायदे?

- कलिंगड खाल्ल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

- कलिंगड खाल्ल्याने हीट स्ट्रोकपासूनही शरीराचा बचाव होतो.

- कार्डियोवस्कुलर रोगांना रोखण्यासही कलिंगडाने मदत मिळते.

Web Title: Watermelon eating tips in summer, know the right way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.