कलिंगडाच्या बियांचे आरोग्याला होणारे एकापेक्षा एक फायदे, वाचाल तर तुम्ही कधीच फेकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 02:25 PM2022-05-02T14:25:19+5:302022-05-02T14:25:37+5:30

Watermelon Seeds Benefits: जास्तीत जास्त लोक कलिंगडातील बीया काढून फेकतात. पण या बियांचे आरोग्याला खूप फायदे होतात. चला जाणून घेऊन कलिंगडातील बियांचे फायदे आणि त्या खाण्याची पद्धत.....

Watermelon Seeds Benefits: from reduce weight, blood sugar lever to skin tanning | कलिंगडाच्या बियांचे आरोग्याला होणारे एकापेक्षा एक फायदे, वाचाल तर तुम्ही कधीच फेकणार नाही!

कलिंगडाच्या बियांचे आरोग्याला होणारे एकापेक्षा एक फायदे, वाचाल तर तुम्ही कधीच फेकणार नाही!

googlenewsNext

Watermelon Seeds Benefits: कलिंगड हे केवळ टेस्टसाठीच नाही तर उन्हाळ्यात शरीराची पाण्याची गरज भागवण्यासाठीही फायदेशीर असतं. कलिंगड भरपूर लोक खातात, पण आरोग्याला त्याच्या होणाऱ्या फायद्यांबाबत सगळ्यांनाच माहीत असतं. पण त्यातील बियांच्या फायद्यांबाबत क्वचितच कुणाला माहीत असतं. जास्तीत जास्त लोक कलिंगडातील बीया काढून फेकतात. पण या बियांचे आरोग्याला खूप फायदे होतात. चला जाणून घेऊन कलिंगडातील बियांचे फायदे आणि त्या खाण्याची पद्धत.....

न्यूट्रिशनल व्हॅल्यू

कलिंगडाच्या बियांमध्ये आयर्न, मॅग्नेशिअम, झिंक आणि हेल्दी फॅट भरपूर प्रमाणात असतं. याच्या ४ ग्रॅम बियांमध्ये साधारण. ०.२९ मिलीग्रॅम आयर्न, २१ मिलीग्रॅम मॅग्नेशिअम, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेडेट फॅटी अॅसिडही असतं. या सर्वच पोषक तत्वांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. 

वजन होतं कमी

कलिंगडाच्या बियांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू यांना एक जबरदस्त सुपरफूड बनवतं. यात फार कमी कॅलरी असतात. याच्या मुठभर बियांचं सेवन करायला हवं. तर यातील पोषक तत्व शरीराला मिळतील. लोक कॅलरी फूड असल्या कारणाने वजन कमी करणाऱ्यांसाठी या बीया फायदेशीर आहेत. लठ्ठपणावर कंट्रोल ठेवून तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता.

ब्लड शुगर लेव्हल

कलिंगडाच्या बियांकडे नेहमीच ब्लड शुगर लेव्हल आणि इन्सुलिन रेजिस्टेंस कमी करण्यासाठी ओखळलं जातं. एका रिसर्चनुसार, कलिंगडाच्या बियांमध्ये आढळणारं मॅग्नेशिअम यासाठी जबाबदार असतं. याने मेटाबालाइजिंग कार्ब्स नियंत्रित होऊन टाइप-२ डायबिटीसमध्ये फायदा मिळतो.

त्वचेवर येतो ग्लो

मॅग्नेशिअम, अॅंटीऑक्सिडेंट्स आणि झिंकसारखे पोषख तत्व असलेल्या कलिंगडाच्या बीया आपल्या त्वचेसाठी फार चांगल्या असतात. याने त्वचेचा टोन सुधारतो आणि त्वचा तजेलदार दिसते. याने त्वचेवर सुरकुत्या येण्याची प्रोसेस हळुवार होते. कलिंगडाच्या बियांमधून निघणाऱ्या तेलाचा वापर अनेक स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये केला जातो.

कलिंगडाच्या बीया खाण्याची योग्य पद्धत

कलिंगडाच्या बीया काढल्यानतर एका पसरट भांड्यात ठेवून त्या वाळत घाला. त्या नंतर एका पॅनवर हलक्या भाजा. त्यानंतर त्या एका डब्यात सांभाळून ठेवा. या बियांचा समावेश तुम्ही तुमच्या मॉर्निंग डाएटमध्ये करू शकता. या बीया तुम्ही सॅलड, ओट्स, टोस्ट किंवा दुसऱ्या बीयांसोबतही खाऊ शकता.

(टिप - कलिंगडाच्या बियांमधून आरोग्याला अनेक फायदे होतात हे वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे. मात्र, प्रत्येकाची शरीर रचना ही वेगवेगळी असते. अशात त्यामुळे या बियांचं सेवन करण्याआधी एक तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
 

Web Title: Watermelon Seeds Benefits: from reduce weight, blood sugar lever to skin tanning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.