सायलेंट किलर हाय ब्लड प्रेशरला दूर करण्यासाठी खास उपाय, कधीच वाटणार नाही अटॅकची भीती!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 10:22 AM2020-02-03T10:22:26+5:302020-02-03T10:24:40+5:30
सध्याच्या काळात बदलत्या वातावरणामुळे आणि जीवनशैलीतील बदलामुळे सगळ्यात वयोगटातील लोकांना आजाराचा सामना करावा लागतो.
सध्याच्या काळात बदलत्या वातावरणामुळे आणि जीवनशैलीतील बदलामुळे सगळ्यात वयोगटातील लोकांना आजाराचा सामना करावा लागतो. त्यात रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत असते. हाय ब्लड प्रेशरला साईलेंट किलर असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे मोठे आजार होण्याची सुद्धा शक्यता असते. तुम्हाला सुद्धा दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून वाचण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही स्वतःला आजारांपासून लांब ठेवू शकता.
ताण-तणावमुक्त रहा
(Image credit- time)
तणाव निर्माण करत असलेल्या हार्मोन्समुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यानंतर ब्लड प्रेशर वाढायला सुरूवात होते. तसंच अस्वस्थ सुद्धा वाटायाला लागतं. अशा परिस्थितीत ओवर इटिंग आणि झोप पुर्ण न होणे, मादक पदार्थांचे सेवन यांमुळे रक्तदाबाची समस्या वाढत जाते. ( हे पण वाचा-रिकाम्या पोटी पेरू खाल्याने पोट साफ होण्यासह मिळेल 'या' गंभीर आजारांपासून सुटका!)
वजन कमी करा
वाढत्या रक्तदाबाच्या समस्येला कमी करण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे वजन कमी करणं. कारण ज्या लोकांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असते अशा लोकांना रक्तदाबाशी संबंधीत आजार होण्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी नियमीत व्यायाम करणं सुद्धा गरजेचं आहे.
शारीरिक हालचाल
सध्याच्या काळात आपण बघतो की अनेकदा व्यायाम करायला लोकांना वेळ मिळत नाही. सतत बसून काम केल्यामुळे तसंच कॅफिनचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे वजन वाढतं आणि रक्तदाबाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शारीरिक हालचाल करणं खूप महत्वाचं आहे.
डॉक्टरांनी दिलेलेचं औषध घ्या
जर जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे सुद्धा तुमचा रक्तादाब खूप जास्त असेल तर तुम्हाला डॉक्टरांना भेटून योग्य ते औषध घेण्याची गरज आहे. त्यासाठी स्वतःच्या मनाने कोणतीही औषध घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यामुळे शरीरात बिघाड होऊन कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता असते.
खाण्यापिण्यावर नियंत्रण
सर्वाधिक समस्या या अनियमित जीवनशैली आणि दारूचे केले जाणारे अतिसेवन यांमुळे उद्भवत असतात. त्यामुळे दारूचे किंवा कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करत नियंत्रणात करावे. आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.
प्रोटिन्सचा आहार
ज्या पदार्थांतून जास्त प्रमाणात प्रोटिन्स मिळतात असे पदार्थ खाण्याची सुरूवात करा. कारण त्यामुळे आजारांपासून लांब राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. यासाठी आहारात दूध, अंडी, मासे, पनीर यांपासून तयार करण्यात आलेल्या किंवा या पदार्थांचे सेवन करा. तसंच रोजच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढून सतत चेकअप करणं गरजेचं आहे. कारण आठवड्यातून एकदातरी रक्तदाब तपासणी केल्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील.( हे पण वाचा- ऑफिस किंवा घरी कुठेही पोट फुगण्याला जबाबदार ५ कारणे, वेळीच बदला 'या' सवयी!)