coronavirus : अशी घ्या काेराेनापासून काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 08:56 PM2020-03-04T20:56:32+5:302020-03-04T21:01:00+5:30
भारतातही काेराेना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
पुणे : चीनमधून पसरलेल्या काेराेना विषाणूमुळे जगभरात हजाराे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव आता चीनबराेबरच इतर देशांमध्ये हाेताना दिसत आहे. भारतात देखील काेराेनाचे 28 रुग्ण आढळले आहेत. काही सुरक्षा घेतल्यास काेराेनापासून आपला बचाव करता येऊ शकताे.
असा पसरताे काेराेना विषाणू
काेराेनाची लागण झालेली व्यक्ती निराेगी व्यक्तीच्या समाेर खाेकल्यास किंवा शिंकल्यास निराेगी व्यक्तीला काेराेनाची लागण हाेऊ शकते. लागण झालेल्या व्यक्तीच्या लाळेच्या माध्यमातून काेराेनाचे विषाणू अनेक वस्तूंवर पसरु शकतात. त्या वस्तूंना तुम्ही स्पर्शकरुन तुमच्या डाेळ्याला, कानाला किंवा नाकाला हात लावल्यास तुम्हाला विषाणूची लागण हाेऊ शकते.
अशी घ्या काळजी
- सातत्याने खाेकणाऱ्या तसेच शिंकणाऱ्या व्यक्तीशी 2 ते 5 मीटरचे अंतर ठेवून संवाद साधा
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, तसेच गर्दीच्या ठिकाणी गेल्यास मास्कचा वापर करा.
- विविध वस्तूंवर काेराेनाचे विषाणू 48 तासांपर्यंत जीवंत राहू शकतात. त्यामुळे सातत्याने तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा. कमीत कमी 20 सेकंदापर्यंत तुमचे हात स्वच्छ करा.
- आजारी व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा
- डाेळे, कान, नाकाला वारंवार हात लावणे टाळा
- आजारी पडल्यास रुग्णालयात जाऊन याेग्य ते उपचार घ्या