शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काही खास उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 07:41 PM2019-05-08T19:41:42+5:302019-05-08T19:43:00+5:30
Immunity म्हणजेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती. बहुतेक लोक सतत आजारी पडत असतात विशेषतः ऋतू बदला नंतर आणि इन्फेक्शनच्या विळख्यात येणे हे याचे प्रमुख कारण असते.
Immunity म्हणजेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती. बहुतेक लोक सतत आजारी पडत असतात विशेषतः ऋतू बदला नंतर आणि इन्फेक्शनच्या विळख्यात येणे हे याचे प्रमुख कारण असते. या आजारपणास कारण बॉडी इम्युनिटी चांगली नसणे हे असते. जर Immune system मजबूत नसेल तर शरीराची रोगांच्या सोबत लढण्याची शक्ती कमी होते ज्यामुळे आपण लवकर आजारी पडतो. वयस्क लोकांच्या तुलनेत लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. काही लोक इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी औषधं घेतात पण विना औषधाच्या घरगुती उपायाने आणि आयुर्वेदिक उपायाने देखील याचा इलाज केला जाऊ शकतो.
रोग प्रतिकारक शक्ती आमच्या शरीराची डिफेंस सिस्टम आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जर शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असातच रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.
एक्सरसाइज :
- शरीर हेल्दी ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या व्यायामाला आपल्या लाइफस्टाइलचा एक भाग बनवा.
- दररोज वॉकसाठी किंवा रनिंगसाठी जा
- कोणत्याही स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीला जॉइन करा
- योगाभ्यासाचा आपल्या डेली रूटिनमध्ये समावेश करा
झोप
पर्याप्त झोप नक्की घ्या. तुमचं दैनंदिन जीवन कितीही बीझी असला तरिही पूर्ण झोप घेणं टाळू नका. असं दिसण्यात आलं आहे की, ज्या वक्ती पूर्ण झोप घेत नाहीत, त्या जास्त आजारी पडतात.
वजन
वजन नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. जर तुमचं वजन जास्त असेल तर शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. याचाच शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होतात. त्यामुळे जर तुमचं वजन वाढत असेल तर वजन कमी करा.
स्मोकिंग-ड्रिंकिंग
धुम्रपान आणि मद्यपान केल्याने शरीराला एक नाही तर अनेक घातक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर सिगरेटमधून बाहेर पडणारा धूर फक्त सिगरेट ओढणाऱ्या लोकांनाच नाही तर त्यांच्या आजूबाजूलाही असणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील परिणाम होतो.
डाएट
फ्रेश फ्रूट्स आणि भाज्यांना आपल्या आहाराचा एक भाग बनवा. जंक फूड खाणं शक्यतो टाळाचं. ज्यूसही आपल्या शरीराला आवश्यक ती सर्व पोषक तत्व मिळण्यासाठी फायदेशीर ठरतो. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत होण्यासाठी मदत होते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.