इलेक्ट्रिक वॉटर फिल्टरचा वापर न करता पाणी शुद्ध करण्याचे '5' पर्याय !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 12:06 PM2018-05-16T12:06:51+5:302018-05-16T12:06:51+5:30
अनेकजण पाणी शुद्ध करण्यासाठी प्युरिफायरचा पर्याय निवडतात. पण इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता या पाणी शुद्ध करायचे हे पर्याय तुम्हाला नक्कीच आवडतील.
खासकरुन पावसाळ्यात दूषित पाण्याचा धोका अधिक असतो. दूषित पाण्यामुळे यामधूनच कॉलरा, डायरिया, कावीळची साथ झपाट्याने वाढते. पण इतरवेळीही पाणी शुद्ध करुनचा प्यायला हवं. अनेकजण पाणी शुद्ध करण्यासाठी प्युरिफायरचा पर्याय निवडतात. पण इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता या पाणी शुद्ध करायचे हे पर्याय तुम्हाला नक्कीच आवडतील.
1) स्वच्छ कापड - अनेक ठिकाणी दुषित पाण्याच्या पुरवठा होण्याची शक्यता असते. अशावेळी मातकट, पिवळसर पाण्याचा प्रवाह होत असेल तर नळाला आधीच पिशवी किंवा स्वच्छ धुतलेले कापड बांधा. यामुळे किमान पाणी गाळून येईल त्यानंतर उकळून तुम्ही पिऊ शकता.
2) नॉन इलेक्ट्रिसिटी प्युरिफायर - सध्या बाजारात इलेक्ट्रिसिटी विनाही पाणी शुद्ध करणारे काही प्युरिफायर्स उपलब्ध आहेत. यामध्ये अॅक्टीव्हेट्स कार्बन आणि UF म्हणजेच अल्ट्राफिल्ट्रेशनच्या मदतीने पाणी स्वच्छ केले जाते.
3) गाळणं - तुम्हांला चांगल्या प्रतीच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरीही किमान पावसाळ्याच्या दिवसात पाणी कपड्याने किंवा गाळणीने गाळूनच मग स्वयंपाकासाठी वापरा.
4) तुरटी - पाणी शुद्ध करण्यासाठी ते भांड्यात भरल्यानंतर त्यावर तुरटी फिरवा. म्हणजे गाळ खाली बसतो. मग उरलेले पाणी गाळून, उकळून पिण्यास सुरक्षित बनवता येते.
5) उकळणं - पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून घेणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे अनेक बॅक्टेरिया, त्रासदायक जंतू यांच्यापासून बचाव होतो.