जेवण केल्यानंतर आंघोळ करणं ठरतं नुकसानकारक, जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 10:04 AM2019-09-20T10:04:35+5:302019-09-20T10:09:39+5:30
जेव्हा विषय खाण्याचा येतो तेव्हा त्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. जर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहणार.
(Image Credit : naukrinama.com)
जेव्हा विषय खाण्याचा येतो तेव्हा त्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. जर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहणार. पण जर सवयी चुकीच्या किंवा वाईट असतील आजारी पडल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सवयीबाबत तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्हाला ही सवय असेल तर वेळीच बदललेली बरी.
जेवण केल्यावर आंघोळ करणं योग्य की अयोग्य?
(Image Credit : colive.in)
आपली लाइफस्टाईल बिझी झाल्यामुळे आपलं रुटीन विस्कळीत होणं सामान्य बाब आहे. यात रोजच्या कामांचाही टाइमटेबल बिघडतो जसे की, योग्य वेळी आंघोळ करणे. जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल तर केवळ चांगला आहार घेऊन उपयोग नाही तर आपल्या जीवनाची प्रत्येक अॅक्टिविटी बॅलन्स असणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊ याबाबत आयुर्वेद काय सांगतं...
आयुर्वेदानुसार
(Image Credit : lifealth.com)
आयुर्वेदानुसार प्रत्येक काम करण्यासाठी एक ठराविक वेळ असतो आणि यात बदल केल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं. जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये. अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.
मॉडर्न सायन्स काय सांगतं?
(Image Credit ; self.com)
आयुर्वेदानुसारच मॉडर्न मेडिकल सायन्स सांगतं की, आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशन डायव्हर्ट होतं. याचा परिणाम असा होतो की, जे रक्त डायडेशनमध्ये मदत करणार असतं, ते त्वचेकडे तापमान मेंटेन करण्यासाठी फ्लो होऊ लागतं.
एक्सपर्ट्स काय सांगतात?
एका एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ केल्याने त्रास होऊ लागतो. याने अॅसिडीटी, उलटी आणि इतकेच काय तर लठ्ठपणाही वाढू शकतो. निसर्गानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला ताजंतवाणं वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याने सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.