कर्करोगाची माहिती करुन देणारं डिवाइस, आता बायॉप्सीची गरज नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 09:57 AM2019-04-02T09:57:44+5:302019-04-02T10:00:00+5:30

कॅन्सर म्हणजेच कर्करोगाची लागण झाल्याची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी बायॉप्सीचा पर्याय शोधला आहे.

Wearable device to diagnose cancer can substitute biopsy | कर्करोगाची माहिती करुन देणारं डिवाइस, आता बायॉप्सीची गरज नसेल!

कर्करोगाची माहिती करुन देणारं डिवाइस, आता बायॉप्सीची गरज नसेल!

Next

कॅन्सर म्हणजेच कर्करोगाची लागण झाल्याची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी बायॉप्सीचा पर्याय शोधला आहे. वैज्ञानिकांनी असा डिवाइस तयार केला आहे, जे थेट रुग्णाच्या रक्तातून कॅन्सर सेल्स एकत्र करू शकतं. याने कॅन्सरची माहिती मिळवण्यासाठी बायॉप्सी करण्याची गरज पडणार नाही. या डिवाइसमुळे काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचं स्क्रीनिंग करून त्यातील कॅन्सरच्या सेल्सची माहिती मिळवता येऊ शकते. 

ट्यूमर्स रक्तात एका मिनिटात साधारण एक हजार कॅन्सर सेल्स रिलीज करू शकतो. कॅन्सरची माहिती मिळवण्यासाठी सध्या वर्तमानातील पद्धत रूग्णांसाठी एका सॅम्पलवर आधारित आहे. एकदा साधारण एक चमचा सॅम्पल घेतलं जाऊ शकतं. एका सॅम्पलमध्ये साधारण १० कॅन्सर सेल्स असतात. अनेकदा कॅन्सरची अ‍ॅडव्हांस स्टेस असूनही सॅम्पलमध्ये एकही कॅन्सरचा सेल सापडत नाही.  

यूएसच्या यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचे प्राध्यापक डॅनियल एफ हेज म्हणाले की, अनेकजणांना बायॉप्सी करायचं नसतं. जर रक्तात कॅन्सर सेल्स मिळाले तर याने ट्यूमरच्या उपचारात मदत होईल आणि याचा फायदा रूग्णाला होईल. 

हे डिवाइस काही तासांमध्येच नसांमधील कॅन्सरचे सेल्स पकडतं. जास्तीत जास्त रक्ताची तपासणी याने केली जाते. डिवाइस तयार करणाऱ्या टीममधील सुनीता नागरथ म्हणाल्या की, ज्याप्रमाणे सुरक्षेसाठी तुम्ही दरवाज्यावर कॅमेरा लावता ज्याद्वारे दर पाच मिनिटाला फोटो घेतले जातील किंवा एक व्हिडीओ कॅमेरा लावत ज्यात व्हिडीओ रेकॉर्डिंग होतं. याचप्रमाणे हे डिवाइस आहे. ५ मिनिटांदरम्यान चोर आला तर त्याला तुम्ही कॅमेरा पकडू शकणार नाही. 

Web Title: Wearable device to diagnose cancer can substitute biopsy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.