सोन्याचे दागिने आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरतात; तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:38 PM2019-05-09T16:38:17+5:302019-05-09T16:41:19+5:30
भारतामध्ये सोन्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं जातं. अनेक महिलांना तर सोन्याचे दागिने परिधान करण्याची आवड असते. प्रत्येकजण आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार, सोन्याचे दागिने खरेदी करतात.
भारतामध्ये सोन्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं जातं. अनेक महिलांना तर सोन्याचे दागिने परिधान करण्याची आवड असते. प्रत्येकजण आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार, सोन्याचे दागिने खरेदी करतात. सोन्याचे दागिने आपल्या सौदर्यात भर घातलतात. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, सौंदर्य वाढविण्यासाठी परिधान करण्यात येणारे दागिने आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया सोन्याचे दागिने परिधान केल्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या फायद्यांबाबत...
तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी
सोन्याचे दागिने परिधान केल्याने शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. अशातच जेव्हाही तुम्हाला ताप, सर्दी-खोकला, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत असेल तर, सोन्याचे दागिने वेअर करून पाहा.
डोकेदुखी दूर करण्यासाठी
डोकेदुखीचा सामना करावा लागत असेल तर हाताच्या तर्जनीमध्ये (Index finger) सोन्याची अंगठी परिधान करा. डोकेदुखीपासून सुटका होण्यास मदत होईल आणि वेदनांची तीव्रताही दूर होईल. असं म्हटलं जातं की, हाताच्या तर्जनीमध्ये डोकेदुखी ठिक करण्यासाठी प्रेशर पॉइंट असतो, अंगठी घातल्याने त्यावर प्रेशर येतं.
अर्थरायटिसच्या वेदनांपासून सुटका मिळेल
आयुर्वेदामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, सोन्याचे दागिने परिधान केल्याने अर्थरायटिसच्या वेदनांपासून सुटका मिळते. सोन्याच्या दागिन्यांचा या गुणधर्मांमुळेच आपल्या परंपरेमध्ये समावेश करण्यात आला आहे.
ब्लड सर्क्युलेशन होतं उत्तम
जेव्हा तुम्ही कंबरेच्या आसपास सोन्याचे दागिने परिधान करता त्यावेळी ब्लड सर्क्युलेशन उत्तम राहतं. तसं पाहायला गेलं तर, याचं काहीच वैज्ञानिक कारण नाही. परंतु जुन्या काळातील वैद्यांचं असं म्हणणं असायचं की, सोन्याचे दागिने परिधान करताना रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी
जेव्हा तुम्ही शरीराच्या वरच्या भागात म्हणजे, मान, गळ्यात, चेहऱ्यावर सोन्याचे दागिने परिधान करत असाल तर, यामुळ शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. इम्यूनिटी बूस्ट झाल्यामुळे अनेक संसर्गजन्य रोगांपासून बचाव होतो.
तणाव कमी करण्यासाठी
सोन्याच्या दागिन्यांमुळे तणाव आणि चिंता दूर होतात. मेंदूचं आरोग्य राखण्यासाठीही सोन्याचे दागिने फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. असं मानलं जातं की, पिवळा धातू परिधान केल्याने तणाव आणि चिंता दूर होतात. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर, सोन्याचे दागिने नक्की परिधान करा. यामुळे तणावापासून सुटका होते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.