उन्हाळ्यात दिवसभर मोजे वापरणे असे पडू शकते महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 02:43 PM2018-04-25T14:43:07+5:302018-04-25T14:43:07+5:30
अनेकजण झोपतानाही मोजे वापरतात. हेही चुकीचे आहे. पायांने हवेशीर ठेवण्यासाठी रात्री मोजे वापरणे टाळा. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात मोजे वापरल्याचे काय दुष्पपरिणाम होतात.
मोजे हे रोजच्या जीवनातील वापराच्या कपड्यांमधील महत्वाचा भाग आहे. पण उन्हाळ्यात सतत मोजे(सॉक्स) घालणे तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. अनेकजण झोपतानाही मोजे वापरतात. हेही चुकीचे आहे. पायांने हवेशीर ठेवण्यासाठी रात्री मोजे वापरणे टाळा. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात मोजे वापरल्याचे काय दुष्पपरिणाम होतात.
रक्त संचार प्रभावित होणे
शरीराच्या प्रत्येक अंगाला रक्ताची गरज असते. घट्ट मोजे घातल्याने पायांच्या नसा दबल्या जातात. त्या दबलेल्या नसांमध्ये योग्यप्रकारे रक्त संचार होत नाही. याकारणाने पूर्ण शरीरातील रक्त संचार प्रभावित होतो. यामुळे पायांचा त्रास वाढतो. पाय दुखायला लागतात.
एडीमा होऊ शकतो
शरीरातील एखाद्या भागात तरल पदार्थ जमा होणे आणि त्या जागेवर सूज येणे हे एडीमाचे लक्षण आहे. ही सूज हळूहळू वाढू लागते. यामुळे पाय सुन्न होतात. ही बाब फार गंभीर आहे. वेळीच डॉक्टरांची सल्ला न घेतल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो.
फंगल इन्फेक्शनचा धोका
पायातून येणारा घाम मोज्यांमध्ये मुरतो. पण जास्तवेळ मोजे तसेच घालून ठेवल्याने मोज्यामधील घाम पूर्णपणे कोरडा होत नाही. त्या मोज्यांमध्ये ओलावा असल्याने त्यात बॅक्टेरिया आणि विषाणू होतात. याच कारणाने फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
अशी घ्या काळजी
डॉक्टर लहान मुलांना नेहमीच जरा मोठे मोजे घेण्याचा सल्ला देतात. सिंथेटीकचे मोजे वापरण्यापेक्षा सूती कापडाचे मोजे वापरावे.