मलेरियाला बळी पडण्याआधीच स्वतःचा करा असा बचाव; जाणून घ्या कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 12:11 PM2019-07-12T12:11:10+5:302019-07-12T12:15:54+5:30
वातावरणासोबतच अनेक आजार बळावण्याचा धोकाही वाढतो. पावसाळा म्हणजे, अनेक किटकांसोबतच डासांच्या प्रजननाचा काळ असतो. या वातावरणामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते.
वातावरणासोबतच अनेक आजार बळावण्याचा धोकाही वाढतो. पावसाळा म्हणजे, अनेक किटकांसोबतच डासांच्या प्रजननाचा काळ असतो. या वातावरणामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी, डेंग्यू आणि मलेरिया यांसारखे जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. यामद्ये भारतामध्ये हाहाकार माजवणारा आजार म्हणजे मलेरिया (Malaria). द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मागील काही वर्षांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियापेक्षाही जास्त मलेरिया झाल्याने लोकांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया मलेरियाबाबतच्या काही सविस्तर गोष्टी आणि त्यापासून बचाव करण्यासाठी काही खास उपाय...
काय आहे मलेरिया?
मलेरिया आजार जगभरामध्ये कोणालाही आणि कोणत्याही ठिकाणी होऊ शकतो. डासांमुळे पसरणाऱ्या या आजारामुळे दरवर्षी अनेक लोक आपला जीव गमावतात. प्रोटोजुअन प्लाज्मोडियम नावाच्या मादा एनोफिलीज डासांच्या माध्यमातून पसरतात. हे डास एका संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत मलेरियाचे व्हायरस पोहोचवण्याचे काम करतात. साचलेल्या किंवा दुषित पाण्यामध्ये होणारी डासांची पैदास मलेरियाचा संसर्ग होण्यासाठी कारण ठरते. खासकरून ग्रामीण आणि अल्पविकसित परिसरामध्ये म्हणजेच, जिथे राहण्याच्या सुविधा आणि स्वच्छतेचा अभाव असतो अशा ठिकाणी होऊ शकतो.
काय म्हणतात आकडे?
विश्व स्वास्थ्य संस्था (WHO)च्या आकड्यांनुसार, जगभरामध्ये प्रत्येक वर्षी जवळपास 50 कोटी लोक मलेरियाने पीडित असतात. ज्यांमध्ये जवळपास 27 लाख रूग्ण जीवंत असतात. ज्यांमध्ये अर्ध्याहून जास्त पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं असतात. डास मलेरियाच्या व्हायरसचे फक्त वाहक म्हणून काम करतात. मलेरियाचा व्हायरस डासांच्या शरीरामध्ये एखाद्या परजीवीप्रमाणे वाढतो. जेव्हा डास एखाद्या व्यक्तीला चावतो, तेव्हा त्याच्या लाळेमार्फत हा व्हायरस व्यक्तीच्या शरीरामध्ये पसरतो.
तीन प्रकारचा असतो मलेरिया...
व्हायरसनुसार मलेरियाचं तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात येतं. मलेरिया टर्शियाना, क्वार्टाना आणि ट्रोपिका. यांमध्ये सर्वात घातक असतो तो म्हणजे, मलेरिया ट्रोपिका. जो पी. फाल्सिपेरम नावाच्या व्हायरसमुळे पसरतो.
या काळात असतो जास्त धोका...
मलेरियाचा संसर्ग आणि आजा पसरण्यासाठी व्हायरसच्या प्रकारानुसार 7 ते 40 दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो. मलेरियाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सर्दी-खोकला, पोटाच्या समस्या यांसारखी लक्षणं दिसून येतात. त्यानंतर काही दिवसांनी डोकं, शरीर आणि सांधेगदुखी, थंडी वाजणं, ताप येणं, उलट्या होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. कधीकधी ताप अचानक वाढतो आणि 3 ते 4 तासांसाठी राहतो.
असा करा स्वतःचा बचाव :
- डास हे मलेरियाचे वाहक असतात. त्यामुळे आवश्यक आहे की, स्वतःला आणि खासकरून लहान मुलांना डासांपासून दूर ठेवा.
- संध्याकाळच्या वेळी डास जास्त असतात. अशावेळी घरातून बाहेर पडणं शक्यतो टाळा.
- घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू देऊ नका.
- शरीर संपूर्ण झाकलं जाईल असे कपडे परिधान करा. त्यामुळे डास चावू शकणार नाहीत.
- झोपण्यापूर्वी अॅन्टी-मॉस्किटो कॉइल किंवा मच्छरदानीचा वापर करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.