लहान मुलाचं वजन जास्त वाढतंय? या गोष्टींनी करा कंट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 10:24 AM2018-10-30T10:24:51+5:302018-10-30T10:25:54+5:30
गोल-मटोल लहान मुलं-मुली कुणाला नाही आवडत? लहान मुलं जितकी हेल्दी असतील तितकं त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.
(Image Credit : Dietitian Priyanka)
गोल-मटोल लहान मुलं-मुली कुणाला नाही आवडत? लहान मुलं जितकी हेल्दी असतील तितकं त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. पण लहान मुलांचं प्रमाणापेक्षा जास्त जाड असणही चांगलं नाहीये. त्यामुळे लहान मुलांचं वजन कंट्रोलमध्ये कसं राहणार यावर लक्ष द्यायला हवं. लहान जाडेपणा लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.
जाडेपणाची वेगवेगळी कारणं
अनुवांशिक हे लहान मुलांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वजन असण्याचं प्रमुख कारण आहे. तसेच फॅटी फूडचं अधिक सेवन, शारीरिक हालचाली कमी करणं, पोषत तत्व असलेला आहार कमी घेणं यानेही लहान मुलांचं वजन वाढतं. अशात मुलांचं वजन कमी ठेवण्यासाठी पालकांनी शक्य ते प्रयत्न केले पाहिजे.
काय कराल उपाय?
लहान मुला-मुलींना साथ द्या
आपल्या लहान मुलांशी बोला. त्यांच्या मनात सुरु असलेल्या अडचणी आणि चिंता व्यक्त करण्यासाठी त्याला समजावा. लहान मुलांचं वजन फार वाढलं असेल तर त्याला किंवा तिला पुन्हा पुन्हा 'तू जाड आहे' असं म्हणून त्याची खिल्ली उडवू नका. त्यांच्यावर या गोष्टींचा फार वाईट प्रभाव पडतो.
चांगल्या आहाराची सवय
पौष्टिक आहार घेण्यासाठी लहान मुलांना प्रोत्साहित करा. नवनवे पौष्टिक पदार्थ त्यांना करुन दिल्यास त्यांचा खाण्याचा उत्साह वाढू शकतो.
अधिक कॅलरीपासून अंतर
पौष्टिक आहार आणि जंक फूड यांच्या फरक काय आहे, याबाबत त्यांच्याशी चर्चा करा. त्यासोबतच चॉकलेट, चिप्स आणि आयस्क्रीमसारखे नरम पदार्थही त्यांना कमीच द्यावे.
त्यांच्यासोबत तुम्हीही खावे
दिवसातून कमीत कमी एकदा आपल्या मुलांसोबत जेवण नक्की करा. जेव्हा लहान मुलं आपल्या पालकांसोबत जेवायला बसतात तेव्हा ते अधिक फळे आणि भाज्या खातात. जास्त फळं आणि भाज्या खाल्यास वजन वाढण्याची समस्या कमी होते.
दैनंदिन वेळापत्रक ठरवा
लहान मुलांच्या शारीरिक हालचालीसाठी एक वेळ निश्चित करा. कारण त्यांच्यासाठी शारीरिक हालचाल ही फार महत्त्वाची असते. त्यांना खेळण्यासाठी किंवा काही अॅक्विव्हिटी करण्यासाठी साधारण ६० मिनिटांचा वेळ द्यावा. धावणे, उड्या मारणे, फुटबॉल आणि स्विमिंग हे त्यांना करु द्या. लहान मुलं जितके जास्त अॅक्टिव राहतील तितके ते फिट राहतील.