दिवाळीत वजन वाढलंय...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2016 05:19 PM2016-10-29T17:19:10+5:302016-10-29T18:20:40+5:30
दिवाळी म्हणजे नवनवीन खाद्य-पदार्थांची मेजवानीच असते. त्यात स्वीट, मिठाई, शंकरपाडे आदी गोड पदार्थ तसेच तेल-तुपात तळलेल्या चकल्या, कारंज्या आदींमुळे नक्कीच वजन वाढते. ....
दिवाळी म्हणजे नवनवीन खाद्य-पदार्थांची मेजवानीच असते. त्यात स्वीट, मिठाई, शंकरपाडे आदी गोड पदार्थ तसेच तेल-तुपात तळलेल्या चकल्या, कारंज्या आदींमुळे नक्कीच वजन वाढते. आपण वेळीच उपाय केला नाही तर ही समस्या पुढे वाढत जाते आणि विविध आजारांना आमंत्रण मिळते. वाढलेले वजन कसे कमी करावे याबाबत आजच्या सदरात आपण जाणून घेऊया...
नियोजन करा
जर आपण वजन कमी करण्याचे नियोजन नाही केले तर आपले वजन कधीही कमी होणार नाही. एक उद्दिष्ट ठरवा आणि त्यानुसार प्लॅन बनवा. किती दिवसात किती किलो वजन कमी करु शकता. मात्र, हा प्लॅन बनवित असताना आपण स्वत:ला कोणत्याही समस्येत अडकवू नका.
खूप झोपा
बरेचजण असे समजतात की, जास्त झोपल्याने वजन वाढते, मात्र नव्या संशोधनानुसार झोपेमुळे वजन कमी होत असते. जर आपण ७ ते ८ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर त्यामुळे जास्त भूक लागते आणि आपण गरजेपेक्षा जास्त खातो. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
स्नॅक्स खाणे टाळा
कित्येकजण जेवणदेखील चारवेळा करतात आणि स्नॅक्सदेखील खातात. जर आपणास वेळोवेळी स्नॅक्स खाण्याची सवय असेल, तर जेवणाचे प्रमाण थोडे कमी करा. यामुळे शरीरातील कॅलरीज वाढतात आणि पर्यायाने वजनदेखील वाढते.
खाण्याचे प्रमाण ठरवा
बहुतेकजण दिवसभर खातच असतात आणि त्यांना माहितदेखील नसते, की त्यांनी किती प्रमाणात जेवण केले. यासाठी आपण दिवसभरात किती खाणार याचे प्रमाण ठरवून घ्या.
भरपूर चाला
कार आणि मोटारसायकल असल्याने बरेचजण चालतच नाहीत. वजन कमी करण्यासाठी भरपूर चाला तसेच पायºयांचादेखील प्रयोग करा. त्याचप्रमाणे आपला मनपसंत खेळ खेळा.
अतिरिक्त कॅलरी हटवा
६५ टक्के लोग शुगर असणारी पेये किंवा कोल्ड्रिंक्स भरपूर पितात. यामुळे पोट भरत नाही, मात्र अतिरिक्त कॅलरीज मिळतात.
जड वजन उचला
आपण पुरुष असो वा महिला, जड वजन उचलल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कॅलरीज मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बर्न होतात.
व्यायामात विविधता आणा
एका दिवसात अनेक प्रकारचे व्यायाम करा, जसे पाच मिनिट कार्डिओ ट्रेडमिल, बाइक केल्यानंतर लगेच डंबेल सर्किट, स्ट्रेचिंग आणि बेंच ओवर करा. हा व्यायाम सातत्याने आठ वेळेस करा.
कार्बोहायड्रेट्स हटवा
वजन कमी करायचे असेल तर आहारातून पास्ता, भात आणि बे्रड आदी वस्तूंना हटवा आणि त्याऐवजी फळे आणि भाजीपाला यांचा समावेश करा. अशाने आपण कितीही खाल्ले तरी वजन वाढणार नाही.
साध्या गोष्टींचा वापर करा
जर आपणाकडे जिम जाण्यासाठी पैसे किंवा वेळ नसेल तर आपण घरीच दोरी उड्या मारा. अगोदर ५० वेळा उड्या मारा नंतर वाढवून १०० वेळा मारा.
जास्त आराम नको
व्यायाम करतेवेळी फक्त १० ते ३० सेकंदापर्यंतच आराम करा. यावेळी जास्त आराम नको.
उपवास करा
आपण जर दिवसातून दोन किंवा तीन वेळेस जेवण करत असाल तर आठवड्यातून एक दिवस उपवास करणे गरजेचे आहे. अशाने आपण सहज आणि आरामाने आपले वजन कमी करु शकाल.
प्रोटीन जास्त खा
प्रोटीन जास्त खाल्ल्याने मांसपेशी बनतात आणि यामुळे शरीरातील फॅट बर्न होते. शिवाय पोटदेखील भरलेले असते.
पाणी भरपूर प्या
आपण दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे आपल्याला जास्त भूक लागणार नाही आणि पोटदेखील भरलेले असेल. तसेच जेवणाअगोदर एक ग्लास पाणी प्यायला हवे, यामुळे नक्कीच वजन कमी होईल.