पावसाळ्यात या पदार्थांमुळे वाढत वजन, वाढू नये म्हणून फॉलो करा या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 21:35 IST2021-06-21T21:30:00+5:302021-06-21T21:35:44+5:30
पावसाचा हंगाम सुरु झाल्यावर गरमा गरम भजी, समोसे, वडे असे तळलेले पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होते. पावसाळा म्हटलं की या सर्वांचा आस्वाद घेणं आलंच पण तुम्ही याचे किती सेवन कराताय यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे.

पावसाळ्यात या पदार्थांमुळे वाढत वजन, वाढू नये म्हणून फॉलो करा या टिप्स
पावसाचा हंगाम सुरु झाल्यावर गरमा गरम भजी, समोसे, वडे असे तळलेले पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होते. पावसाळा म्हटलं की या सर्वांचा आस्वाद घेणं आलंच पण तुम्ही याचे किती सेवन कराताय यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही खाच. याचा पुरेपुर आनंद घ्या पण आरोग्याकडे लक्ष देऊन. असे पदार्थ सतत खाल्ल्यामुळे तुमचे वजनही जास्त प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे वेळीच तोंडाला आवर घाला.
सिझनल फळे खा
पावसाळ्यात अनेक प्रकारची फळे मिळतात. ही तुमच्या फिटनेससाठी अत्यंत महत्वाची असतात. ही फळे अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असतात. याचा वजन कमी करण्यात फायदा होतो. त्यामुळे पावसाळ्यात चिकू, लीची, जांभळ अशी फळं खा. ही फळं खाल्ल्याने तेलकट पदार्थ खाण्याची तल्लफही कमी करतात. तसेच ही पावसाळ्या दरम्यान तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात.
थोडं थोडं खा
पावसाळ्यात तुमच्या घरी गरमागरम भज्या बनत असतील. तुम्ही त्या नक्की खा पण एकाचवेळेत सर्व संपवू नका. थोडं थोडं खा. यामुळे हे पदार्थ सहज पचतात व भुकही कमी लागते. तसेच तुम्ही हे फक्त आठवड्यातून एकदाच खाण्याचा प्रयत्न करा.
भरपूर पाणी प्या
पावसाळा आहे म्हणून तहान कमी लागते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाणी पिणे कमी केले पाहीजे. भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील टॉक्सीन्स बाहेर फेकले जातात. तसेच तुम्हाला भूकही कमी लागते.
हेल्दी सुप प्या
पावसाळ्यात तुम्हाला काही गरमागरम खाण्याचे मन करतच असेल तर तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा भाज्यांचे गरमागरम सुप प्या. लक्ष ठेवा की तुम्ही यात मसालेदार पदार्थांचा वापर करत नाही आहात.
कमी साखरेची चहा
पावसाळ्यात आल्याचा चहा म्हणजे आनंदच. पण वारंवार चहा प्यायची सवय असेल तर त्यात साखर कमी टाका किंवा टाकूच नका. साखरेमुळे तुमचे वजन वाढते. त्यामुळे पावसाळ्याच आल्याचा चहा प्याच पण साखरेपासून दूर राहा.