अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 10:20 AM2020-01-23T10:20:43+5:302020-01-23T10:21:22+5:30

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यासंबंधी तुम्ही सगळी माहिती जमवली असेल तर तुम्हाला हे चांगलंच माहीत असेल की, वजन कमी करण्यात डाएटची किती महत्वाची भूमिका आहे.

For weight loss cut down carbohydrates not calories | अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात....

अनेक प्रयत्न करूनही वजन कमी का होत नाही? जाणून घ्या एक्सपर्ट्स काय सांगतात....

googlenewsNext

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यासंबंधी तुम्ही सगळी माहिती जमवली असेल तर तुम्हाला हे चांगलंच माहीत असेल की, वजन कमी करण्यात डाएटची किती महत्वाची भूमिका आहे. तुमच्या या माहितीत आम्हीही थोडी माहीत अधिकची देणार आहोत. एक्सपर्ट्स सांगतात की, वजन कमी करण्यात ७० टक्के डाएट आणि एक्सरसाइजचं ३० टक्के योगदान असतं. त्यामुळेच डाएटकडे खास लक्ष देऊन तुम्ही शरीरातील जमा एक्स्ट्रा फॅट घटवण्यास फार मदत मिळते.

कमी खावे कार्बोहायड्रेट्स

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक प्रोटीनचं सेवन जास्त आणि फॅट व कार्बोहायड्रेट्सचं सेवन कमी करतात. पण हे चुकीचं आहे. कारण आहारातून कॅलरी योग्य प्रमाण कायम ठेवणंही महत्वाचं आहे. त्यामुळे आहारातून कॅलरी कमी करू नका, त्याऐवजी कार्बोहायड्रेट कमी करा, असं एक्सपर्ट्स सांगतात.

(Image Credit : moxsie.com)

वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, कॅलरी नाही तर कार्बोहायड्रेट तुमच्या वाढत्या वजनाचं कारण आहे. कार्बोहायड्रेट पोटात गेल्यानंतर एक हार्मोन रिलीज होतं, जे तुमच्या वजन वाढण्याला कारणीभूत ठरतं. त्यामुळे कार्बोहायड्रेटचं सेवन कमी करा. कार्बोहायड्रेटमुळे शरीरात रिलीज झालेल्या हार्मोनचं प्रमाण कमी झालं नाही तर फॅट बर्न होणार नाही. कदाचित याच कारणामुळे पॅलिओ डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स घेतले जात नाहीत.

कमी कार्बोहाड्रेट्सने वजन कमी कसं होतं?

एक ग्रॅम कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर आपल्याला ४ ग्रॅम कॅलरी मिळतात. कार्बोहायड्रेटच्या विघटनातून ग्लूकोज मिळतं, जे आपल्या मेंदूमध्ये ऊर्जेसारखं काम करतं. ग्लूकोजचं प्रमाण कमी झाल्यावर जेव्हा आपलं कार्बोहायड्रेटचं रोजचं सेवन ५० ग्रॅमने कमी होतं तेव्हा शरीर ग्लूकोजला पर्याय म्हणून कीटोन्सचा वापर करतं. हे फॅटी अॅसिडच्या विघटनापासून तयार एक पदार्थ आहे.

वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी कमी कार्ब किंवा कमी फॅट असलेल्या पदार्थांचं सेवन कमी प्रभावी आहे. पण तरी सुद्धा यावरून वाद होत राहतो. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याआधी तुमच्या डाएटिशिअनचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

लो-कार्ब डाएट

(Image Credit : ditchthecarbs.com)

हेल्दी कार्ब्सचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा. वजन कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट डाएटमधून पूर्णपणे दूर करणेही योग्य नाही. कार्ब्ससोबतच पीठामध्येही अनेक महत्वपूर्ण पोषक तत्वे असतात. यासाठी डाएटमध्ये भात आणि चपातीचं प्रमाण ठेवू शकता. त्याऐवजी भाज्या, डाळी, कडधान्य आणि फळांचं सेवन अधिक करा. तुम्ही ड्रायफ्रूट्सचं देखील सेवन करू शकता.


Web Title: For weight loss cut down carbohydrates not calories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.