दुधामुळे खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या दूध आणि वजनाचं कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 11:29 AM2019-08-06T11:29:38+5:302019-08-06T11:39:01+5:30
वजन कमी करण्यासाठी अनेकजण दुधाचं सेवन बंद करतात. पण खरंच दुधाचं सेवन बंद करून वजन कमी होतं का?
(Image Credit : The List)
दुधात कॅल्शिअम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळेच दुधाला पौष्टिक आहाराचा महत्वपूर्ण भाग मानलं जातं. दुधातील कॅल्शिअममुळे हाडे आणि दातांना मजबूती मिळते. तर प्रोटीनमुळे मांसपेशींची निर्मिती आणि त्यांना मजबूती मिळते. त्यामुळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना दूध दिलं जातं. पण अनेकजण वजन कमी करण्यासाठी डायटिंग करतात आणि दुधाचं सेवन बंद करतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी दुधाचं सेवन बंद करणं फायदेशीर ठरतं का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ....
(Image Credit : Daily Star)
अनेकांचा हा समज आहे की, दुधाचं सेवन केल्याने वजन वाढतं. मुळात मलाई असलेल्या दुधाचं सेवन केल्याने तुमचं वजन नक्कीच वाढू शकतं. पण टोन्ड आणि डबल टोन्ड दूध हे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं.
दुधात किती कॅलरी असतात?
(Image Credit : Reader's Digest)
एक कप दुधात स्वाभाविक रूपाने १५० कॅलरी असतात, कारण यात नॅच्युरल शुगर आढळते. तेच बाजारात उपलब्ध फ्लेवर्ड दुधात एक्स्ट्रा शुगर असते, ज्यामुळे कॅलरींचं प्रमाणही अधिक वाढतं.
दूध आणि वजनाचं कनेक्शन
१) दूध हे प्रोटीनचं एक स्त्रोत आहे. आणि हे आपणा सर्वांनाच माहीत आहे की, प्रोटीन शरीराच्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे. याने भूकेचे हार्मोन्स रेग्युलराइज करण्याचं काम केलं जातं. प्रोटीनमुळे पोट भरलेलं राहतं आणि तुम्हाला भूक कमी लागते.
(Image Credit : Cleveland Clinic Health Essentials)
२) दात आणि हाडांच्या मजबूती सोबतच कॅल्शिअम वजन कमी करण्यासही मदत करतं. वेगवेगळ्या रिसर्चनुसार, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी पचनक्रिया सुधारून शरीराला कॅलरी बर्न करण्यास मदत करतं.
३) दुधात व्हिटॅमिन बी ३ चं अधिक प्रमाण तुम्हाला वजन नियंत्रित ठेवण्यात आणि ऊर्जा कायम ठेवण्यात मदत करतं.
४) प्रोटीन पचनाला अधिक वेळ लागतो आणि याने तृप्तीची, संतुष्टीची भावना निर्माण होते. जेव्हा तुमचं पोट भरलेलं राहतं, तेव्हा तुम्ही जंक फूडचं सेवन कमी करता.
५) नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर येतं की, दुधात लिनोलेनिक अॅसिड असतं, जे कॅलरी बर्न करण्यात मदत करतं.
दूध आणि वजन वाढणं
(Image Credit : Daily Express)
दुधाने वजन तेव्हाच वाढतं जेव्हा तुमच्या आहारातून अतिरिक्त कॅलरी घेतल्या जातील. जर दुधाने तुमचं वजन वाढत असेल तर याचा अर्थ हा होतो की, तुम्ही तुमच्या आहारातून भरपूर प्रमाणात कॅलरीचं सेवन करत आहात. दुधामुळे वजन वाढत नाही.
काय आहे सत्य?
(Image Credit : lifealth.com)
दूध किंवा इतर डेअरी उत्पादने सेवन केल्याने कोणताही समस्या होत नाही. पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही कमी कॅलरी असलेल्या दुधाचं सेवन करावं. १ कप लो कॅलरी दुधात केवळ ८६ कॅलरी असतात. फ्लेवर्ड दुधाऐवजी नेहमी शुगर नसलेल्या दुधाचं सेवन करावं.