झटपट वजन कमी करायचंय?; नाश्त्यामध्ये खा 'हा' पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 02:30 PM2019-06-01T14:30:08+5:302019-06-01T14:33:12+5:30
लठ्ठपणाच्या समस्येन सध्या प्रत्येकजण हैराण आहे. धावपळीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर, लहान मुलांनाही लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
लठ्ठपणाच्या समस्येन सध्या प्रत्येकजण हैराण आहे. धावपळीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर, लहान मुलांनाही लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शरीराचं वजन कमी करण्यासाठी ओट्स फायदेशीर ठरतात. ओट्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. तसेच शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्वही असतात. ओट्सच्या सेवनाने पोट बऱ्याचवेळ भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे तुम्ही ओवर इटिंगपासून दूर राहू शकता. तसेच बराच वेळ पोट भरल्याप्रमाणे राहिल्याने सतत भूकही लागत नाही.
तुम्हाला माहीत आहे का? हेच ओट्स रात्रभर पाण्यामध्ये भिजवून खाल्याने कमी वेळात वजन कमी करण्यासाठी मदत होते. ओट्स गॅसवर शिजवून खाण्याऐवजी रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ले तर यामध्ये न्यूट्रिएंट्स वाढतात आणि लवकर वजन कमी करतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वजन कमी करण्यासाठी पाण्यात भिजत ठेवलेले ओट्स कसे फायदेशीर ठरतात त्याबाबत...
वेगाने वजन कसं कमी करतात भिजवलेले ओट्स?
रात्रभर भिजवलेले ओट्स सकाळी एकदम मुलायम होतात. हे पचण्यासही हलके असतात आणि पौष्टिकही असतात. बराच वेळ भिजत ठेवल्याने ओट्स दही किंवा दूधाचं सर्व पोषण समाविष्ट होतं.
भिजवलेले ओटस खाल्याने आतड्यांमधील अस्वच्छ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे फॅट्स बर्न होण्यास मदत होते. तसेच यामध्ये स्टार्च लेव्हल कमी होतं. ज्यामुळे शरीरामध्ये स्टार्च लेव्हल कमी होते. ज्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण राखण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.