लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये खा बेसनाचा पोळा; वेट लॉस डाएट म्हणून उत्तम पर्याय 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:36 PM2019-04-19T12:36:44+5:302019-04-19T12:41:27+5:30

सध्याची धकाधकीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेकदा असं पाहायला मिळतं की, वाढत्या वजनाला कंटाळून लोक चविष्ट पदार्थ खाण्यापासून दूर पळतात.

Weight loss diet plan how to lose weight with besan | लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये खा बेसनाचा पोळा; वेट लॉस डाएट म्हणून उत्तम पर्याय 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये खा बेसनाचा पोळा; वेट लॉस डाएट म्हणून उत्तम पर्याय 

Next

सध्याची धकाधकीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेकदा असं पाहायला मिळतं की, वाढत्या वजनाला कंटाळून लोक चविष्ट पदार्थ खाण्यापासून दूर पळतात. जर तुम्हीही त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी एर गुड न्यूज आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता तुम्हाला स्वादष्ट पदार्थांपासून दूर पळण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये बेसनाचा समावेश करू शकता. वजन कमी करण्यासाठी बेसन मदत करतं. बेसनामध्ये 38 टक्के प्रोटीन आणि 20 टक्के कार्ब आढळून येतात. 

जवळपास सर्वच व्यक्तींसाठी हा पर्याय आदर्श ठरतो. ज्या व्यक्ती हेल्दी राहून वजन कमी करण्याच्या विचारात आहेत. त्यांच्यासाठी बेसन अगदी उत्तम ठरतं. बेसन चण्याच्या डाळीपासून तयार करण्यात येतं. जर तुम्ही बेसनाचा वापर करून वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही, बेसनाचा पोळा, कढी, भजी, खांडवी किंवा पॅनकेकचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करू शकता. बेसनाचा उपयोग फक्त डाएटमध्येच नाही तर त्वचेसाठीही करण्यात येतो. जाणून घेऊया बेसनाचा वापर करून लठ्ठपणा कमी करण्याच्या काही टिप्स...

लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं बेसन :

1. लठ्ठपणा कमी करण्यासाठी डाएटमध्ये बेसनाचा कोणत्याही पदार्थाचा समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन-बी1, बी2 आणि बी-9 मुबलक प्रमाणात आढळून येते. या पदार्थांच्या सेवनाने शरीराचं वजन अगदी वेगाने कमी होतं. 

2. बेसनामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं. जर तुम्ही वेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी बेसन हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत ठरू शकतो. 100 ग्रॅम बेसनामध्ये 20 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी बेसनाच्या पिठाचा वापर करू शकता. 

3. बेसनाचा आहारात समावेश केल्याने कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं आणि डायबिटीजचाही धोका नसतो. यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने डायबिटीजच्या लोकांसाठी उत्तम डाएट मानलं जातं.

4. ज्या लोकांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असते त्यांच्यासाठी बेसन उत्तम स्त्रोत आहे. हे शरीरामध्ये रक्ताची कमतरता दूर करून थकवा दूर करतं. बेसनामध्ये थायमीन असतं, जे शरीराला एनर्जी देण्याच काम करतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Weight loss diet plan how to lose weight with besan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.