वाढलेल्या पोटामुळे चारचौघात लाज वाटते का? पोट कमी करण्यासाठी फक्त फॉलो करा हे नियम!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 11:48 AM2023-06-13T11:48:35+5:302023-06-13T11:49:12+5:30
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सकाळची वेळ बेस्ट मानली जाते. पोटावरील चरबी कमी करायची असेल किंवा पूर्ण शरीरातील फॅट सकाळच्या काही सवयींमुळे कमी होऊ शकतं.
Tips Belly fat: तुमचं बाहेर आलेलं पोट बघणाऱ्या लोकांमुळे तुम्हाला अनेकदा अस्वस्थ वाटत असेल. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी विचार करतात पण नेहमीच आळसामुळे त्यांचं वजन काही कमी होत नाही. मात्र जर काही दिवस वेटलॉस टिप्स व्यवस्थित फॉलो करण्यात आल्या तर वजन नक्कीच कमी होईल. तुम्हाला आळसपणा दूर करावा लागेल.
वजन कमी करण्यासाठी सकाळची वेळ बेस्ट मानली जाते. पोटावरील चरबी कमी करायची असेल किंवा पूर्ण शरीरातील फॅट सकाळच्या काही सवयींमुळे कमी होऊ शकतं. हेल्दी मॉर्निंग रूटीन ना केवळ मेटाबॉलिज्म मजबूत करतं तर कॅलरी बर्न करण्याची क्रियाही वाढवतं. चला जाणून घेऊ अशाच काही सवयी....
कोमट पाणी
कुणी काही म्हणो पण रोज सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने चरबी विरघळून जाते आणि पोटही साफ होते. याने मेटाबॉलिज्म सुधारतं. शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर निघतात. तुम्ही सकाळी कोमट पाण्यात मध किंवा लिंबू टाकून सेवन करू शकता.
पाण्याची बॉटल
दिवसाची सुरूवात तुम्ही कोमट पाण्याने केल्यावर शरीर दिवसभर हायड्रेट ठेवण्यासाठी सतत पाणी पित राहणं गरजेचं आहे. याने वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. यामागे तर्क असा आहे की, पिण्याचं पाणी हाय कॅलरी ड्रिंक्सच्या रूपात एक्स्ट्रा कॅलरी खाणं टाळण्यास मदत मिळते.
नाश्त्याची वेळ ठरवा
अनेकांना हे माहीत नाही की, योग्य नाश्ता काय असतो. अनेकजण तेलकट पदार्थ खातात. त्यांनी नाश्त्यात प्रोटीन आणि फायबर तत्व असलेल्या पदार्थांचं अधिक सेवन करावं. तेलकट, फास्टफूडचं सेवन करू नये. याने वजन वाढतं. कडधान्य खावे.
सोबत स्नॅक्स ठेवा
दिवसभर हेल्दी स्नॅक्स घेणं फार महत्वाचं आहे. तुमचं शरीर एका मशीनसारखं काम करतं. जे काही काही तासांनी फ्यूल करावं लागतं. काही वेळ काढा आणि तुमची इच्छा शांत करण्यासाठी अनहेल्दी काही खाण्याऐवजी काही हेल्दी खा आणि ते सोबत ठेवा.
एक्सरसाइज गरजेची
सकाळी काही करून थोडा वेळ एक्सरसाइज करणं फार महत्वाचं आहे. याने तुमचं वजन कमी होऊ शकतं. हे करत नसाल किंवा करायचं नसेल तर वजन कधीच कमी होणार नाही. सकाळी व्यायाम करणं फार फायदेशीर असतं. याने तुमचं वाढलेलं वजन कमी होतं आणि कॅलरीही घामाच्या माध्यमातून बर्न होतात.