समोसा, पिझ्झा, बर्गर खाल्लं तरी वजन वाढणार नाही; फक्त करा 'हे' काम, रिसर्चमध्ये खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 02:59 PM2024-06-10T14:59:24+5:302024-06-10T15:13:16+5:30
एका रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे लोक वजन कमी करत आहेत ते केक, चॉकलेट, पेस्ट्री यासारख्या जास्त फॅट असलेल्या पदार्थांचं सेवन करू शकतात, त्यासाठी तुम्हाला रोज एक गोष्ट करावी लागेल.
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना जास्त फॅट असलेले पदार्थ खाण्यास मनाई आहे कारण त्यामध्ये खूप जास्त कॅलरी असतात. पण नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे लोक वजन कमी करत आहेत ते केक, चॉकलेट, पेस्ट्री यासारख्या जास्त फॅट असलेल्या पदार्थांचं सेवन करू शकतात, त्यासाठी तुम्हाला रोज एक गोष्ट करावी लागेल.
नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित स्कॉटलंडच्या एबिरडीन युनिव्हर्सिटीच्या स्टडीनुसार, जर कोणी दर आठवड्याला ५ तास व्यायाम करत असेल तर ते डेयरी प्रोडक्ट आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाऊ शकतात. रिसर्चमध्ये एखाद्या व्यक्तीच्या डाएटचं परीक्षण केलं गेलं नाही, परंतु लोकांच्या एकूण आरोग्यावर आणि फिजिकल फिटनेसच्या आधारावर फॅटला मेटाबॉलाइज कसं केलं जातं ते पाहिलं.
रिसर्चमध्ये पुरुषांच्या दोन गटांचं विश्लेषण करण्यात आलं, त्यापैकी एकाला टाइप 2 डायबेटीस होता आणि ते जास्त व्यायाम करत नव्हते. दुसऱ्या गटात अधिक व्यायाम करणाऱ्या पुरुष एथलीटचा समावेश होता. त्यानंतर दोन्ही गटांनी आपली जीवनशैली बदलली. खेळाडूंच्या गटाने दर आठवड्याला ९ तास व्यायाम करणे बंद केलं आणि ज्या गटाने व्यायाम केला नाही तो गट दर आठवड्याला ५ तास व्यायाम करू लागला.
जीवनशैली बदलल्यानंतर, लोकांच्या शरीरात थोड्या प्रमाणात फॅट इंजेक्ट केलं गेलं. त्यांचा एमआरआय करण्यात आला आणि त्याच्या स्नायूंच्या पेशींमध्ये फॅटची काय रिएक्शन दिसून आली हे पाहण्यात आलं. स्टडीमध्ये असं आढळून आलं की एथलीट्सने सॅच्युरेटेड फॅट एनर्जीच्या रुपात बर्न केली. टाइप 2 डायबेटीस असलेल्या ग्रुपमधील लोकांच्या शरीरात सॅच्युरेटेड फॅट जमा झालं आहे.
एबरडीन विद्यापीठातील कार्डिओव्हस्कुलर मेडिसिन विभागाचे प्रमुख प्रोफेसर डाना डॉसन म्हणाले की, 'आम्हाला आढळलं की एथलीट्स हाय इंटेन्स व्यायामासाठी फॅट स्टोरेजचा वापर करतात.' याउलट, जेव्हा टाइप 2 डायबेटीस असलेल्या लोकांमध्ये फॅट स्टोरेज दिसून आलं. तेव्हा समजलं की एंड्युरेन्स एक्सरसाईजने त्यांच्या शरीरात जमलेल्या फॅटला एनर्जीच्या रुपात वापरायला सुरुवात केली आहे.
८ आठवड्यांनंतर एक्सरसाईज न करणारे एथलीट्स आणि डायबेटीस करणाऱ्या लोकांनी फॅट वापरायला सुरुवात केली आहे. डॉसन पुढे म्हणाले, "एकंदरीत, या अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे की एखाद्या व्यक्तीचे कार्डिओ-मेटाबॉलिक हेल्थ तुम्ही एनर्जीसाठी कार्डियो मेटाबॉलिकचा किती चांगला वापर करता यावर अवलंबून असते. हे रिझल्ट नवीन आहेत. त्यामुळे दर आठवड्याला किमान पाच तास व्यायाम करा."