शिल्पा शेट्टीप्रमाणे झिरो फिगर हवीय?; मग ट्राय करा तिचीच वेट लॉस रेसिपी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 02:34 PM2019-04-30T14:34:20+5:302019-04-30T14:36:07+5:30
सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये कामाचा ताण आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेकांना वाढत्या वजनाचा सामना करावा लागतो. अशावेळा स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सपासून ते डाएटीशयनपर्यंत सर्वांचा सल्ला घेतो.
सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये कामाचा ताण आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेकांना वाढत्या वजनाचा सामना करावा लागतो. अशावेळा स्वतःला फिट ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्सपासून ते डाएटीशयनपर्यंत सर्वांचा सल्ला घेतो. पण तरिही काही फायदा होत नाही. अशातच बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं असं म्हणणं आहे की, वजन कमी करणं फारसं सोप नाही. शिल्पा यासाठी काटेकोरपणाने डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज करण्याचा सल्ला देते. परंतु यासोबतच असं गरजेचं नाही की, तुम्ही तुमच्या आवडीच्या पदार्थांना कायमचं बाय म्हणावं. ती असंही म्हणते की, असे अनेक प्रकार आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही गिल्टशिवाय तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ खाऊ शकता आणि वजन वाढण्याच्या भितीपासून दूर राहू शकता.
शिल्पा स्वतः हेल्दी डिशेज तयार करते आणि तुमच्या फॅन्सनाही ती या रेसिपी ट्राय करण्याचा सल्ला देते. काही दिवसांपूर्वीच शिल्पाने एक रेसिपी शेअर केली असून ही रेसिपी क्विक वेट लॉसची गॅरंटी देते. चाळीस वर्षांची फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टीने व्हिडीओ शेअर केल्यानंतर कोकोनट पीनट बारचे फायदे सांगितले आहेत. कोकोनट म्हणजेच नारळामध्ये हाय फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. परंतु हे उत्तम प्रकारे वेट मॅनेज करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. शिल्पाने स्वतः तयार केलेल्या यम्मी स्नॅक्सच्या फायद्यांबाबत सांगितले आहे.
शिल्पाने सांगितल्यानुसार, हा पदार्थ तुमची गोड पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करणार नाही. तर हे इंस्टंट एनर्जी बूस्टर म्हणूनही काम करतं. कोकनट पीनट बार पाहून कोणाच्याही तोडांला पाणी सुटेल. खरं तर ह हाय फ्रोटीन बार तुम्ही अनेक आठवड्यांपर्यंत स्टोअर करून ठेवू शकता.
कोकनट पीनट बार किंवा खोबरं आणि शेंगदाण्याची चिक्की का आहे हेल्दी?
खोबरं पचनक्रिया वाढविण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्याने हा वजन कमी करण्यासठी अत्यंत फायदेशीर ठरतो. तसेत यामुळे बद्धकोष्टाचा त्रासही होत नाही. कच्चा नारळ ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठीही मदत करतो. यामध्ये अनेक असे हार्मोन्स असतात, ज्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. हेच वेट लॉस करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
(Image Credit : foodnetwork.com)
शेंगदाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जे फोलेट, मॅग्नेशिअम, लोह, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन ई यांसारखी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. शेंगदाण्यांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. हे फॅट्स हृदयाचे आरोग्य राखण्यासोबतच वेट लॉससाठीही फायदेशीर ठरतात. एवढचं नाही तर यांमध्ये कॅलरी बर्न करण्याची क्षमता असते. यामुळे शरीर नेहमी ताजतवानं राहण्यास मदत होते.
ही आहे तयार करण्याची पद्धत :
(Image Credit : Daily Burn)
साहित्य :
- गुळ
- तूप
- किसलेला नारळ
- शेंगदाणे
कृती :
- एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यामध्ये गुळ वितळून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे आणि किसलेलं खोबरं एकत्र करा.
- तयार मिश्रणं एका ताटामध्ये पसरवून घ्या आणि चिक्कीप्रमाणे कापून घ्या.
- मिश्रण गॅसवरून उतरवून घ्या आणि थंड होऊ द्या.
- तुमचा कोकनट पीनट बार खाण्यासाठी तयार आहे.
कोकनट पीनट बार तुम्ही भूक लागल्यावर किंवा एक्सरसाइज करण्याआधी खाऊ शकता. यामुळे तुमची एनर्जी लेव्हल हाय राहिल आणि कॅलरी बर्न करण्यास मदत होइल.