बाजारात आलं लठ्ठपणा कमी करण्याचं इंजेक्शन, वर्षभरात तब्बल 'इतकं' किलो वजन घटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 05:54 PM2022-02-10T17:54:39+5:302022-02-10T17:56:27+5:30
या उपायात तुम्हाला ना डाएट करावं लागणार ना जिममध्ये व्यायाम कारवा लागणार फक्त घ्याव लागणार एक इंजेक्शन.
वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासन्तास घाम गाळतात. अक्षरश: पोटाची खपली पडेपर्यंत डाएट करतात. पण याचा फायदा किती होतो हे तुम्हाला माहितीच असेल. पण यावर एक रामबाण उपाय आला आहे. मुख्य म्हणजे या उपायात तुम्हाला ना डाएट करावं लागणार ना जिममध्ये व्यायाम कारवा लागणार फक्त घ्याव लागणार एक इंजेक्शन.
तुम्हाला खरं वाटत नसेल पण ब्रिटनमध्ये एक असं इंजेक्शन आलं आहे ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल. हे इंजेक्शन दर आठवड्याला लठ्ठ व्यक्तींना लावलं जाणार आहे. खरंतर याची तयारीच सुरु झालीये. बीबीसीच्या रिपोर्टनुसार या इंजेक्शनची ट्रायल यशस्वी झाली आहे. या अशाप्रकारच्या उपाचाराला semaglutide असं म्हटलं जातं.
semaglutide हे एकप्रकारचे औषध आहे जे भुक कमी करते. जेव्हा हे इंजेक्शन लावले जाते तेव्हा भुक कमी लागते व त्यामुळे ती व्यक्ती कमी खाते. याचा परिणाम म्हणजे त्या व्यक्तीचं वजन कमी होतं. ट्रायल दरम्यान असं निदर्शनास आलं की योग्य डाएट अन् व्यायाम करण्यासोबतच ज्या व्यक्तींना हे इंजेक्शन देण्यात आलं त्या व्यक्तींचं वजन ६८ आठवड्यात १२ टक्क्यांनी कमी झालं.
डेली मेल या वेबसाईटनुसार ज्या व्यक्तींना हे इंजेक्शन देण्यात आलं त्या व्यक्तींचं वजन वर्षभरात १६ किलोनं कमी झालं. या इंजेक्शनच्या वापराला National institute for health and care excellence (NICE) नं मान्यता दिली आहे. ज्यांचा बॉडी इंडेक्स मास ३५ च्या वर आहे, त्यांना हे इंजेक्शन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. बीएमआय ३० ते ३५ असणाऱ्या व्यक्तीही डॉक्टरांच्या सल्ल्याने हे इंजेक्शन वापरु शकतात.
हे इंजेक्शन घेणाऱ्यांना सुचना देण्यात आली आहे की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे इंजेक्शन घेणं थांबावावं अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील.हे इंजेक्शन आतापर्यंत बाजारात आलेले नाही. पण NICEच्या गाईडलाईन्स पुर्ण झाल्यावरच हे इंजेक्शन बाजारात येणार आहे.