weight-loss: जाड लोकांसाठी खुशखबर! लठ्ठपणा कमी करण्याचे औषध आले; अमेरिकन FDA ने दिली 'पेना'ला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 08:16 PM2021-06-05T20:16:53+5:302021-06-05T20:18:02+5:30

weight-loss medicine: सध्या जगात वजन कमी करण्याची जी औषधे आहेत, ती 5 ते 10 टक्केच वजन कमी करतात. अमेरिकेत 10 कोटी लोक लठ्ठपणाचा शिकार झालेले आहेत.

weight-loss: Obesity-reducing drugs came, weight loss by 15%; US FDA approves Wegovy | weight-loss: जाड लोकांसाठी खुशखबर! लठ्ठपणा कमी करण्याचे औषध आले; अमेरिकन FDA ने दिली 'पेना'ला मंजुरी

weight-loss: जाड लोकांसाठी खुशखबर! लठ्ठपणा कमी करण्याचे औषध आले; अमेरिकन FDA ने दिली 'पेना'ला मंजुरी

googlenewsNext

weight-loss by 15 percent: लठ्ठपणाशी (Obesity) लढणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी आहे. अमेरिकेची सर्वोच्च मेडिकल संस्था FDA ने जाडी कमी करण्यासाठी एका अशा औषधाला मंजुरी दिली आहे की ते 15 टक्क्यांनी वजन घटविते. खरेतर हे एक मधुमेहावरील इंजेक्शन ( Novo Nordisk's diabetes drug semaglutide) आहे, मात्र अमेरिकेमध्ये यापुढे या औषधाचा वजन कमी करण्यासाठी देखील वापर केला जाणार आहे. हे इंजेक्शन वजन कमी करण्याच्या नावानेच बाजारात आणले जाणार आहे. (FDA approves popular diabetes medicine to be sold as weight-loss drug in US)


हे औषध नोवो नॉरडिस्क (Novo Nordisk) या औषध निर्माता कंपनीने बनविले आहे. या औषधाचे नाव आहे वीगोवी (Wegovy). वीगोवी हे याच कंपनीचे औषध सीमैगलुटाइड (Semaglutide) चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या औषधामध्ये खूप काळ वजन कमी ठेवण्याची क्षमता आहे. ज्या लोकांवर या औषधाची चाचणी करण्यात आली त्यांचे वजन जवळपास 15 टक्क्यांनी कमी झाले आहे. 100 किलो वजन असलेल्या लोकांचे वजन 15.3 किलोने कमी झाले आहे. या औषधाची ट्रायल जवळपास 14 महिने घेण्यात आली. 14 महिने या व्यक्तींचे वजन घटत होते. यानंतर ते एका स्तरावर येऊन थांबले. (how to weight-loss by 15 kg, )

लुईविले मेटाबोलिक अँड एथेलेस्क्लेरॉसिस रिसर्च सेंटरचे मोडिकल डायरेक्टर डॉ. हेरोल्ड बेस यांनी सांगितले की, सध्या जगात वजन कमी करण्याची जी औषधे आहेत, ती 5 ते 10 टक्केच वजन कमी करतात. अमेरिकेत 10 कोटी लोक लठ्ठपणाचा शिकार झालेले आहेत. जर एखाद्याचे वजन 5 टक्क्यांनी जरी कमी झाले, तरी त्याला मोठे फायदे होतात. त्याच्यातील ताकद वाढते, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलदेखील नियंत्रणात येते. 


वजन कमी करण्याचा औषधांवर नेहमी सुरक्षेचे प्रश्न उपस्थित होतात. परंतू हे औषध खूप सुरक्षित आहे. याचे काही साई़ड इफेक्ट असू शकतात. मळमळ, डायरिया, उलटीसारखे. मात्र, काही दिवसांनी ते दिसत नाहीत. फक्त हे औषध थायरॉईड असलेल्या लोकांसाठी नाहीय, असे ते म्हणाले. 
 

Web Title: weight-loss: Obesity-reducing drugs came, weight loss by 15%; US FDA approves Wegovy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.