'हे' डिवाइस लावून लठ्ठपणाला करा टाटा बाय बाय, दोन आठवड्यात ६ किलो वजन कमी होण्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 02:13 PM2021-12-29T14:13:26+5:302021-12-29T14:15:26+5:30
DentalSlim Diet Control : लठ्ठपणाच्या समस्येने हैराण लोक नेहमीच या प्रयत्नात असतात की, जास्त मेहनत किंवा एक्सरसाइज न करता त्यांचं वजन कमी व्हावं. पण असं होत नसतं.
Weight Loss Device : जेव्हापासून कोरोना व्हायरस झाला, तेव्हापासून जास्तीत जास्त लोक घरातून काम करत आहेत. अशात त्यांना आरोग्यासंबंधी समस्या तर होतच आहेत, सोबतच त्यांचं वजनही भरपूर वाढत (Obesity) आहे. लठ्ठपणाच्या समस्येने हैराण लोक नेहमीच या प्रयत्नात असतात की, जास्त मेहनत किंवा एक्सरसाइज न करता त्यांचं वजन कमी व्हावं. पण असं होत नसतं. अशा लोकांसाठी वजन कमी करण्याची एक नवीन टेक्नीक शोधण्यात आली आहे.
वजन कमी करणारं डिवाइस
'डेली मेल' डॉट कॉमच्या वृत्तानुसार, ब्रिटन आणि न्यूझीलॅंडच्या वैज्ञानिकांनी एक वजन करणारं उपकरण तयार केलं आहे. ज्यात दातांना एकत्र चिकटवून ठेवण्यासाठी मॅग्नेट आणि लॉकिंग बोल्टचा वापर केला जातो.
न्यूझीलॅंडच्या ओटागो विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांनी तयार केलेलं डेंटलस्लिम डाएट कंट्रोल (DentalSlim Diet Control) ला एका डेंटिस्ट प्रोफेशनल्स द्वारे वरच्या आणि खालच्या दातांना लावलं जातं. हे उपकरण घालणारी व्यक्ती केवळ २ मिमी इतकंच तोंड उघडू शकते. ते केवळ द्रव्य रूपातील आहार घेऊन शकतात. असं असलं तरी याने श्वास घेण्यास आणि बोलण्यात काहीच अडचण येत नाही.
सहा किलो वजन कमी होण्याचा दावा
हे उपकरण एकदा दातांना लावल्यानंतर या उपकरणाचा उद्देश ठोस खाद्य पदार्थ खाण्यापासून रोखणं हा असतो. उपकरण तयार करणाऱ्यांनी दातांच्या पुन्हा पुन्हा चावण्याच्या प्रक्रियेला रोखण्याबाबत सांगितलं.
ब्रिटीश डेंटल जर्नलमध्ये या उपकरणाच्या ट्रायलमध्ये सांगण्यात आलं की, सहभागी लोकांनी दोन आठवड्यात सरासरी ६.३६ किलोग्रॅमपर्यंत वजन कमी केलं. सोबतच वजन कमी करणाऱ्या सहभागी लोकांना हा प्रवास कायम ठेवायचा आहे. जेणेकरून त्यांचं वजन आणखी कमी होईल.