वजन घटवण्याचा शॉर्टकट पडू शकतो महागात, डाएटीशिनिस्ट रुजुता दिवेकर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 04:48 PM2021-06-25T16:48:47+5:302021-06-25T16:49:20+5:30

काही जण कमी वेळात वजन घटवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. पण हे सर्व तुम्हाला महागात पडू शकतं. वजन घटवण्याच्या शॉर्टकटचे परिणामही भयंकर असू शकतात.

Weight Loss Shortcuts Can Be Expensive, Dietitian Rujuta Divekar Advises | वजन घटवण्याचा शॉर्टकट पडू शकतो महागात, डाएटीशिनिस्ट रुजुता दिवेकर यांचा सल्ला

वजन घटवण्याचा शॉर्टकट पडू शकतो महागात, डाएटीशिनिस्ट रुजुता दिवेकर यांचा सल्ला

googlenewsNext

अनेकजण वजन घटवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. काही जण कमी वेळात वजन घटवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतात. पण हे सर्व तुम्हाला महागात पडू शकतं. वजन घटवण्याच्या शॉर्टकटचे परिणामही भयंकर असू शकतात. त्यामुळे वजन घटवण्याचा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रयत्न केला की वजन घटण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सेलिब्रिटी डाएटीशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी वजन घटवण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्या आधी त्यांनी शरीराचे वजन म्हणजे काय? याचा व्याख्या स्पष्ट केली आहे.

वजन हे दोन प्रकारचे असते
एक असते फॅट बॉडी वेट दुसरे असते लीन बॉडी वेट. फॅट बॉडी वेट तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबीचे असते तर लीन बॉडीवेट तुमच्या शरीरातील अवयव, स्नायु, हाडे यांचे असते. रुजुता म्हणतात, जसे आमचे वजन वाढत जाते तसे शरीराचे फॅट बॉडीवेट वाढत जाते आणि लीन बॉडी वेट कमी कमी होत जाते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर व शरीरावर वाढत्या वयाची लक्षणे दिसू लागतात. काहीजण हे फॅट बॉडीवेट कमी करण्यासाठी मग इंटेन्स वर्कआऊट करतात, किटो डाएट करतात. पण याचे परिणाम उलट होतात. यामध्ये वजन घटण्याएवजी वाढू लागते. उलट तुम्ही अशक्त होत जाता आणि तुमचे शरीर अधिक लठ्ठ दिसते.


रुजुता म्हणतात की वजन घटवण्यासाठी जलद गतीने वजन घटवण्याएवजी योग्य पद्धतीने वजन घटवणे होय. त्यामुळे तुमचे वजन आणि तुमचे आरोग्य आयुष्यभर संतुलित राहिल. तुमच्या शरीरातील आतील आणि बाहेरील अवयव सुदृढ राहतील.


वजन मोजण्याची योग्य पद्धती काय?
वजन मोजणे म्हणजे केवळ वजन काट्यावर वजन मोजणे नव्हे तर मेटाबॉलिज्म, ब्लड प्रेशर, पाचन शक्ति, प्रजनन क्षमता, संतुलित कोलेस्ट्रॉल ही वजन मोजण्याची मानके आहेत.

Web Title: Weight Loss Shortcuts Can Be Expensive, Dietitian Rujuta Divekar Advises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.