एक वाटी पालक झटपट दूर करेल शरीरातील चरबी, जाणून घ्या कशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 10:47 AM2019-07-20T10:47:54+5:302019-07-20T10:51:05+5:30
डाएटच्या वेगवेगळे पर्यायांपैकी एक चांगला पर्याय म्हणजे पालक. पालक भाजीच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता.
वजन कमी करण्याचा विषय निघाला की वेगवेगळे डाएट प्लॅन समोर येतात. वेगवेगळ्या एक्सरसाइज आठवू लागतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि एक्सरसाइज निवडण्याची गरज असते. डाएटच्या वेगवेगळे पर्यायांपैकी एक चांगला पर्याय म्हणजे पालक. पालक भाजीच्या मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता.
पालक भाजी वजन कमी करण्याच्या प्रोसेसचा वेग वाढवते आणि सोबतच एक्स्ट्रा कॅलरी बर्न करणं सुद्धा सोपं होतं. यासाठी तुम्हाला केवळ रोजच्या डाएटमध्ये एक वाटी पालक भाजीचा समावेश करणं गरजेचं आहे. याने तुमच्या कॅलरी बर्न करण्यास मदत मिळेल.
पालक भाजीमध्ये कॅलरी नियंत्रित करणारे फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे एक मुख्य तत्व आहे ज्याने वजन कमी करणं सोपं होतं. यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या रिसर्चमध्ये आढळले की, काही महिला तीन महिन्यांपासून वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होत्या. यातील ज्या महिलांनी दररोज साधारण पाच ग्रॅम पालकाचं सेवन केलं, त्यांना वजन कमी करण्यास अधिक मदत मिळाली.
पालक भाजीचा फायदा कसा होतो?
वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारातून कमी कॅलरी घेणं गरजेचं असतं. एक कप पालकमध्ये केवळ ७ कॅलरी असतात. तर फायबरमुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. याने तुम्हाला भूक लागत नाही. त्यामुळे सतत काहीना काही खाऊन शरीरात एक्स्ट्रा कॅलरीही जमा होत नाहीत.
पालकातून तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर मिळत, ज्याने कॅलरी नियंत्रित होतात. त्यामुळे पालक भाजीचा समावेश आहारात करा. तुम्हाला काही दिवसातच याचा फरक बघायला मिळेल.
पालक भाजीचे इतर फायदे
पालक ही आरोग्यासाठी सर्वात चांगली भाजी मानली जाते. एक कप पालकमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन ए असतात. यातील पोटॅशिअममुळे रक्तदाबही कंट्रोलमध्ये राहतो. रक्तदाबाचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहण्यास पोटॅशिअम महत्त्वाची भूमिका बजावतं.
फायबर असलेल्या पदार्थांमुळे पचनक्रिया चांगली होते. पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि यामुळेच आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. दिवसातून एक कप पालक तुमची पचनक्रिया मजबूत करण्यासाठी पुरेशी आहे. त्यामुळे रोजच्या आहारात पालक भाजीचा समावेश करून तुम्ही वजन करण्यासोबतच आरोग्यही चांगली ठेवू शकता.
(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. ही डाएट सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला एकदा घ्यावा. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते आणि त्यानुसार वेगवेगळ्या डाएटचा प्रभाव पडत असतो.)