वजन कमी करण्याचा 'हा' उपाय वाचून व्हाल अवाक्, लगेच मिळेल फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 10:29 AM2024-02-02T10:29:59+5:302024-02-02T10:30:53+5:30
वजन नियंत्रित ठेवण्याचा एक चांगला आणि सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आजकाल वजन वाढण्याची समस्या अनेकांना होते. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण काहींना यातून फायदा मिळतो तर काहींना मिळत नाही. वजन वाढण्याची कारणे वेगवेगळी असू असतात. सगळ्यांना ते काही दिवसात कमी व्हावं असं वाटत असतं.
वजन नियंत्रित ठेवण्याचा एक चांगला आणि सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वजन वाढण्याला व्यक्ती स्वत: जबाबदार असते. आणि वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वेगवेगळ्या एक्सरसाइजची गरज पडते. अशात आणखी एक उपाय आहे ज्याने तुम्ही सहजपणे वजन नियंत्रित ठेवू शकता.
सोपा आणि चांगला उपाय
वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर मानसिक शांतता मिळवा. मानसिक शांतता मिळवून तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता. वेगवेगळे उपाय आधीच करून झाले असतील तर हा उपाय ट्राय करा. पण जर तुम्ही मानसिक रूपाने शांत राहणार नाही, तर तुम्ही वजन कमी करू शकणार नाहीत.
वजन वाढण्याची कारणे?
हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो की, मानसिक शांतता मिळवून वजन कमी कसं केलं जाऊ शकतं? त्याआधी तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, तणाव आणि सतत चिंता करणे या गोष्टी वजन वाढण्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे अर्थातच वजन कमी करण्यासाठी खूश राहणे गरजेचे आहे. तज्ज्ञ सांगतात की, आनंदी राहून व्यक्ती त्यांचं बरंचसं वजन कमी करू शकतात.
जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा नकारात्मक विचारांमधून तुम्ही जात असता. यामळे स्ट्रेस हॉर्मोन कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं. आणि जेव्हा शरीरात कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं तेव्हा तुम्हाला फार थकवा जाणवतो. त्यामुळे तुम्ही एक्सरसाइज करत नाहीत. सोबतच तुम्ही त्या पदार्थांकडे आकर्षित होता, ज्याने तुमचं वजन वाढतं.
आनंदी राहून वजन कमी कसं होतं?
वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी आनंदी राहणं फार गरजेचं असतं. वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलं आहे की, जेव्हा तुम्ही आनंदी होता, तेव्हा शरीरात डोपामाइन हार्मोनचं प्रमाण वाढतं. डोपामाइनमुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच आनंदी राहिल्याने तणाव कमी होतो. एका रिसर्चनुसार, तुम्ही आनंदी असता तेव्हा किमान १० कॅलरी बर्न करत असता.
आनंदी राहण्यासाठी काय करावं?
आता तुम्ही विचार करू लागले असाल की, आनंदी राहण्यासाठी काय करावं? तर सर्वातआधी तुमची लाइफस्टाईल नियमित करा. तसेच आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचार करा, तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करा, आनंदी लोकांना भेटा, एक्सरसाइज करा इत्यादी. रोजच्या जगण्यात आनंदी राहण्यासाठी वेगवेगळी कारणे शोधा.
आहारातही करा बदल
तुम्ही आनंदी आणि हेल्दी राहण्यासाठी तुम्ही हेल्दी डाएटचाही आधार घेऊ शकता. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट असलेल्या पदार्थांचा समावेश करा. त्यासोबतच भरपूर पाणी प्यावे आणि हलक्या पदार्थांचं सेवन करावं. पुरेशी झोप घ्यावी. झोपण्याच्या दोन तासांपूर्वी डिजिटल वस्तूंपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. याने तुमचा तणाव आणि चिंता दूर राहील.