Weight Loss Tips : रोज 'ही' हिरवी भाजी खाल तर लगेच होईल वजन कमी, एकदा करून बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 03:01 PM2022-03-01T15:01:29+5:302022-03-01T15:02:11+5:30
Weight Loss Tips : लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय करत असतात. वजन कमी करण्याच्या प्रवासात हिरव्या भाज्यांचं फार महत्व असतं.
Weight Loss Tips : वजन कमी करणं आजकालच्या काळात लोकांची सर्वात मोठी समस्या झाली आहे. वजन वाढवणं तर सोपं असतं, पण कमी करणं फारच अवघड असतं. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय करत असतात. वजन कमी करण्याच्या प्रवासात हिरव्या भाज्यांचं फार महत्व असतं. हिरव्या भाज्या एक हेल्दी णि बॅलन्स्ड डाएटचा भाग असतात.
हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. जे वजन कमी करण्यात मदत करतात. एक्सपर्टचा सल्ला आहे की, प्रत्येक जेवणात हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करा. सोबतच असाही सल्ला दिला आहे की, जेवणात वेगवेगळ्या रंगाच्या भाज्यांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. मात्र, जेव्हा वजन कमी करण्याचा विषय येतो तेव्हा हिरव्या पालेभाज्या तुम्हाला फार मदत करू शकतात.
डायटिशिअन जेनी चॅम्पियन म्हणाले की, पालक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जेनी म्हणाले की, पालक सुपर लो-कॅलरी फूड आहे. १०० ग्रॅम पालकमध्ये २३ कॅलरीज असतात. त्यासोबतच प्रति १०० ग्रॅम पालकमध्ये १.५ ग्रॅम कार्बोहायड्रेट आढळतात. जेनीने पुढे सांगितलं की, वेळोवेळी करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, डाएटमध्ये कार्ब्स कट केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. अशात जर तुम्ही लोक कार्ब्स डाएट फॉलो करत असाल तर पालक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यासोबतच पालक एक हाय फायबर फूडही आहे.
जेनीने सांगितलं की, फायबरयुक्त पदार्थांचा सेवन करून जास्त वेळ तुमचं पोट भरलेलं राहू शकतं. त्यासोबतच तुम्हाला टॉयलेटसंबंधी समस्यांचा सामनाही करावा लागणार नाही. याने डायजेस्टिव सिस्टीम चांगलं राहतं. पण कोणत्याही गोष्टीचं अत्याधिक सेवन नुकसानकारक ठरू शकतं. अशात पालकाचंही सेवन योग्य प्रमाणात केलं पाहिजे. फार जास्त प्रमाणात पालक खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. अशात रोज केवळ एक कप पालकाचं सेवन करावं. तुम्ही सलादच्या रूपातही पालकाचं सेवन करू शकता.
पालकाला आपली स्वत:ची अशी काही टेस्ट नसते. अशात तुम्ही यात काही आणखी पदार्थ मिश्रित करून स्मूदीसारखं सेवन करू शकता. चला जाणून घेऊ ती कशी तयार करायची.
साहित्य
एक संत्री
एक कप स्ट्रॉबेरी
एक कप कच्ची पालक
एक कप बदामाचं दूध
हे सर्व पदार्थ ब्लेंडरमध्ये टाका ते चांगल्याप्रकारे ब्लेंड करा. गरजेनुसार यात पाणी आणि मीठ मिश्रित करा. तुमची स्मूदी तयार आहे.