Weight Loss Tips : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज किती वेळ सायकल चालवावी? जाणून घ्या फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 11:34 AM2022-06-18T11:34:40+5:302022-06-18T11:34:55+5:30

Weight Loss Tips : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, वजन आणि चरबी कमी करण्यासाठी सायकल चालवल्याने (Cycling Benefit) फायदा होतो. सायकल चालवल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो, मासंपेशी मजबूत होता आणि बॉडी फॅट कमी होतं.

Weight Loss Tips : Cycling benefits for health reduce belly fat lose weight burn calorie | Weight Loss Tips : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज किती वेळ सायकल चालवावी? जाणून घ्या फायदे...

Weight Loss Tips : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज किती वेळ सायकल चालवावी? जाणून घ्या फायदे...

googlenewsNext

Weight Loss Tips : चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेकदा लोक लठ्ठपणाचे शिकार होतात. पोट आणि कंबरेच्या आजूबाजूला चरबी वेगाने जमा होऊ लागले. ही चरबी कमी करणं फारच अवघड असतं. जर तुम्हाला वजन आणि चरबी कमी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, वजन आणि चरबी कमी करण्यासाठी सायकल चालवल्याने (Cycling Benefit) फायदा होतो. सायकल चालवल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो, मासंपेशी मजबूत होता आणि बॉडी फॅट कमी होतं.

सायकलिंगने बर्न होतात कॅलरीज

एका रिसर्चनुसार, वजन कमी करण्यासाठी तुम्ही एक्सरसाइजच्या माध्यमातून एका आठवड्यात कमीत कमी २ हजार कॅलरी बर्न करायल्या हव्यात आणि तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की तुम्ही नियमितपणे सायकल चालवली तर एका तासात तुम्ही ३०० कॅलरी बर्न होतात. अशात तुम्ही जेवढी जास्त सायकल चालवाल तुमच्या तेवढ्या जास्त कॅलरी बर्न होतील आणि शरीरातून फॅट कमी होईल. पण यासाठी फार गरजेचं आहे की, तुम्ही सायकल चालवण्यासोबतच हेल्दी डाएटही घ्यावी.

- तुम्हाला मार्केटमध्ये जायचं असेल किंवा ऑफिस, शाळेत जायचं असेल तर सायकलचा वापर करा. 

- कॅलरीज बर्न करण्यात मदत करण्यासोबतच सायकल चालवल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून तुमचा बचाव करू शकता.

- सायकल चालवून तुम्ही हृदयासंबंधी आजार, स्ट्रोक, डायबिटीस, डिप्रेशनपासून बचाव करू शकता.

- सायकलिंग एक लो-इम्पॅक्ट एक्सरसाइज आहे. जी कोणत्याही वयाचे लोक एन्जॉय करू शकता.

- सायकल चालवल्याने मानसिक आरोग्य जसे की, डिप्रेशन, तणाव आणि चिंता कमी करू शकता.

रोज किती चालवावी सायकल? 

सायकल चालवणे ही केवळ एक मजेदार अॅक्टिविटीच नाही तर याने मसल्स टोन होतात, हाडं मजबूत होतात आणि वजनही कमी होतं. अनेक रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, रोज एक तास सायकल चालवल्याने तुम्ही ३०० कॅलरी बर्न करू शकता. हेल्थ एक्सपर्ट रोज ३० ते ६० मिनिटं सायकल चालवण्याचा सल्ला देतात. 

Web Title: Weight Loss Tips : Cycling benefits for health reduce belly fat lose weight burn calorie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.