Weight Loss Tips : वेगाने कमी होणार वजन, फक्त रोज सकाळी उठून करावी लागतील ही २ सोपी कामं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 01:31 PM2022-03-25T13:31:18+5:302022-03-25T13:31:26+5:30

Weight Loss Tips :  ब्रिटिश डॉक्टर मायकल मोस्ले यांनी वजन करण्यासाठी एक्सरसाइजसोबतच डाएटचं महत्वही सांगितलं आहे. त्यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की, सकाळी उठून कोणती २ कामं केल्याने वेगाने वजन कमी करण्यात मदत मिळते. 

Weight Loss Tips : Dr Michael Mosley shares 2 simple things exercise to do every morning | Weight Loss Tips : वेगाने कमी होणार वजन, फक्त रोज सकाळी उठून करावी लागतील ही २ सोपी कामं!

Weight Loss Tips : वेगाने कमी होणार वजन, फक्त रोज सकाळी उठून करावी लागतील ही २ सोपी कामं!

googlenewsNext

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक इंटरनेटवरील माहितीवर अवलंबून असतात. वेट लॉससाठी ते डाएट प्लान, एक्सरसाइज, पद्धती इत्यादींचा शोध घेतात आणि ते फॉलो करतात. कोरोना काळानंतर लोकांमध्ये त्यांच्या वाढलेल्या वजनाबाबत जागरूकता बघायला मिळत आहे. ज्यामुळे अनेक फिटनेस एक्सपर्ट्सही टिप्स शेअर करत आहेत. ब्रिटिश डॉक्टर मायकल मोस्ले यांनी वजन करण्यासाठी एक्सरसाइजसोबतच डाएटचं महत्वही सांगितलं आहे. त्यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की, सकाळी उठून कोणती २ कामं केल्याने वेगाने वजन कमी करण्यात मदत मिळते. 

काय म्हणाले डॉक्टर?

डॉ. मायकल म्हणाले की, 'मला वाटतं की, केवळ एक्सरसाइज करून वजन कमी करण्यात मदत मिळत नाही. एक्सरसाइज मूड चांगला करण्यात मदत करते. त्याशिवाय काही नाही. डेटा सांगतो की, जर डाएटसोबत एक्सरसाइज केली गेली तर वजन कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करताना सर्वांचं लक्ष फॅट लॉसवर असायला पाहिजे. मसल्स लॉसवर नाही. वजन कमी करताना मसल्स लॉस होऊ नये यासाठी दिवसातून कमीत कमी ५० ग्रॅम चांगल्या क्लालिटीचं प्रोटीन सेवन करा.

या दोन प्रकारे वेगाने वजन होईल कमी

डॉ. मायकल मोस्ले म्हणाले की, ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रोज सकाळी उठून २ एक्सरसाइज कराव्या. या एक्सरसाइजसाठी तुम्हाला कोणत्याही साहित्याची गरज नाही आणि कुणीही कोणत्याही वयात या एक्सरसाइज करू शकतात. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पुश अप्स किंवा प्रेस अप आणि स्क्वॉट एक्सरसाइज कराव्या. या

एक्सरसाइज तुम्ही घरी सहजपणे करू शकता

मायकल मोस्ले म्हणाले की, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, धावणं, चालणं, स्वीमिंग करणं, सायकल चालवणं यांसारख्या एरोबिक अॅक्टिविटीने हार्ट आणि फुप्फुसं चांगले राहतात. या अॅक्टिविटीसोबत रोज सकाळी या २ एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतो. नव्या रिसर्चमधून स्पष्ट झालं की, ताकद मिळणाऱ्या एक्सरसाइज रोज केल्याने मसल्स आणि मेंदूचं काम असणाऱ्या कामांमध्ये मदत मिळते.

पुश अप आणि स्क्वॉटने वजन होईल कमी

पुश अप एक्सरसाइजने शरीराच्या वरच्या भागाला ताकद मिळते आणि स्क्वॉटने लोअर बॉडीसोबत मेंदूला फायदा होतो. पुश अप एक्सरसाइजने मसल्स टोन होतात, सोबतच झोपेतही सुधारणा होते. तेच स्क्वॉट एक्सरसाइजने मेंदूच्या कार्यात सुधारणा होते.

कधी करायच्या या एक्सरसाइज?

मायकल यांच्यानुसार, सकाळी पुश अप आणि स्क्वॉट एक्सरसाइज करणं चांगलं मानलं जातं. मी सुद्धा रोज सकाळी एक्सरसाइज करतो. रोज सकाळी उठून कमीत कमी ४० पुश अप करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर स्क्वॉट एक्सरसाइज करतो. नव्याने सुरूवात करत असाल तर हळूवार करा. एकाच दिवशी खूप जास्त वेळ एक्सरसाइज करू नका. 
 

Web Title: Weight Loss Tips : Dr Michael Mosley shares 2 simple things exercise to do every morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.