वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील या टिप्स; दररोज करा फॉलो!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 08:16 PM2019-02-27T20:16:29+5:302019-02-27T20:17:43+5:30
वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण सतत प्रयत्न करत असतात. एक्सरसाइज, डायटिंग आणि योगाभ्यास यांसारख्या अनेक गोष्टी केल्या जातात. अनेकदा तर जिम किंवा बाजारामध्ये मिळणाऱ्या महागड्या औषधांचाही सर्रास वापर केला जातो.
वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण सतत प्रयत्न करत असतात. एक्सरसाइज, डायटिंग आणि योगाभ्यास यांसारख्या अनेक गोष्टी केल्या जातात. अनेकदा तर जिम किंवा बाजारामध्ये मिळणाऱ्या महागड्या औषधांचाही सर्रास वापर केला जातो. या सर्व गोष्टी वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. पण अनेकदा यासर्व गोष्टींऐवजी घरच्या घरी केलेले उपायही फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने फॅट बर्न करण्यासाठी मदत मिळते. या टिप्स फॉलो करून तुम्ही दोनच दिवसांमध्ये वजन कमी करू शकता.
असं करा वजन कमी :
सफरचंदाचं व्हिनेगर
सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये अॅसिटिक अॅसिड असतं. जे शरीरामधील सूज आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करतं. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. याचं सेवन करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा व्हिनेगर एकत्र करा. तुम्हाला गरज असल्यास त्यामध्ये तुम्ही मधही एकत्र करू शकता.
मध आणि लिंबू
वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मधाचं सेवन करणं फायदेशीर असतं. वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस आणि मध फायदेशीर ठरतं. लिंबामध्ये अस्तित्वात असणारं व्हिटॅमिन-सी फॅट ऑक्सीडेशनमध्ये मदत करतं. याचं सेवन करण्यासाठी दिवसातून 3 ते 4 वेळा एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि 2 चमचे मध एकत्र करून त्याचे सेवन करा.
ग्रीन टी
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचं सेवन फायदेशीर ठरतं. ग्रीन टी कॅचीनचा स्त्रोत आहे. जे वजन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. त्यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा ग्रीन टीचं सेवन करा.