वजन कमी करायचं असेल तर रात्री कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 04:34 PM2022-09-27T16:34:14+5:302022-09-27T16:34:29+5:30

Weight Loss : काही पदार्थ असे असतात जे खाऊन तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचतं आणि वजनही वाढतं. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर खालील पदार्थ रात्री खाणे टाळा.

Weight Loss Tips : Foods avoid night when trying lose weight | वजन कमी करायचं असेल तर रात्री कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ, वेळीच व्हा सावध!

वजन कमी करायचं असेल तर रात्री कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ, वेळीच व्हा सावध!

googlenewsNext

Weight Loss :  जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी भरपूर मेहनत करत असाल आणि रात्री काहीही खाल तर तुमचं वजन कमी करण्याचं स्वप्न कधीच पूर्ण करणार नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला हेल्दी आणि बॅलन्स डाएट म्हणजेच आहार घेण्याची गरज आहे. खासकरून रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही असे पदार्थ खाणे टाळा, जे वजन वाढण्याला मुख्य कारणीभूत असतात. काही पदार्थ असे असतात जे खाऊन तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचतं आणि वजनही वाढतं. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर खालील पदार्थ रात्री खाणे टाळा.

१) चॉकलेट 

अलिकडे चॉकलेट खाण्याचं प्रमाण फार जास्त वाढलं आहे. चॉकलेट खाण्याचे आरोग्याला अनेक फायदेही होतात. चॉकलेटने मूड चांगला होतो आणि चॉकलेट हृदय आणि मेंदूसाठीही हेल्दी मानलं जातं. यात साखर, कॅलरी आणि फॅट अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चॉकलेट खाणं टाळलं पाहिजे. खासकरून त्यांनी ज्यांचं वजन जास्त आहे.

२) ड्राय फ्रूट्स

काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड हे ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर असतात. पण यातही कॅलरींचं प्रमाण अधिक असतं. जेव्हा तुम्ही रात्री यांच सेवन करता तेव्हा शरीर अॅक्टिव नसतं. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यात कॅलरींचा फार कमी वापर होतो. याने कॅलरी शरीरात फॅटच्या रूपात जमा होत राहतात. त्यामुळे ड्रायफ्रूट्स एकतर सकाळी खावेत नाही तर दिवसा. रात्री अजिबात खाऊ नये.

३) फ्रूट ज्यूस

बाजार उपलब्ध डबाबंद रेडिमेड ज्यूस पिणे आरोग्यासाठी चांगलं नसतं. कारण यात शुगरचं प्रमाण भरपूर असतं. सोबतच कोल्ड ड्रिंक्समध्ये सोडा असतो आणि यात शुगरही असतं. फायबर आणि पोषत तत्व हे तयार करतानाच निघून जातात. त्यामुळे ज्यूस पिण्याऐवजी ताजी फळे खाणं अधिक चांगलं ठरतं.

४) आइस्क्रीम 

वजन कमी करायचं असेल तर झोपण्यापूर्वी आइस्क्रीमही अजिबात खाऊ नका. यात फॅट आणि आर्टिफिशिअल शुगर अधिक प्रमाणात असते. ज्याने शरीरात कॅलरी इनटेक अधिक होते. 

५) पिझ्झा

रात्री पिझ्झा खाऊन झोपत असाल तर तुमचं वजन वाढू शकतं. कारण पिझ्झामध्येही भरपूर प्रमाणात कॅलरी असतात. चीज, सॉस असलेली शुगर पिझ्झा बेससाठी वापरल्या जाणाऱ्या पिठात रिफाइन कार्ब्स असतात. जे वजन वाढण्याला कारणीभूत ठरतात. नॉनव्हेज पिझ्झामध्ये ट्रान्स फॅट असतात, जे वजन वाढण्याला कारणीभूत ठरतात.

Web Title: Weight Loss Tips : Foods avoid night when trying lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.