फक्त 5 दिवसांतच 3 किलो वजन करा कमी; फॉलो करा अॅपल डाएट प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 02:07 PM2018-11-24T14:07:27+5:302018-11-24T14:10:26+5:30

सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू असून सगळीकडेच जोरदार तयारी सुरू आहे. अशातच तुम्हीही त्यासाठी प्लॅनिंग करत असालच. अरे बापरे काय सांगताय? वेडिंग सिझनमध्ये वाढलेल्या वजनामुळे तुम्ही तुमचा फेवरेट ड्रेस वेअर करू शकत नाही.

weight loss tips how to lose 3kg in one week | फक्त 5 दिवसांतच 3 किलो वजन करा कमी; फॉलो करा अॅपल डाएट प्लॅन!

फक्त 5 दिवसांतच 3 किलो वजन करा कमी; फॉलो करा अॅपल डाएट प्लॅन!

सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू असून सगळीकडेच जोरदार तयारी सुरू आहे. अशातच तुम्हीही त्यासाठी प्लॅनिंग करत असालच. अरे बापरे काय सांगताय? वेडिंग सिझनमध्ये वाढलेल्या वजनामुळे तुम्ही तुमचा फेवरेट ड्रेस वेअर करू शकत नाही. इतकचं ना.... अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पाच दिवसांच्या एका स्पेशल डाएटसंदर्भात. हे डाएट फॉलो करून तुम्ही जवळपास 3 किलो वजन कमी करू शकता. या डाएटचं नाव आहे 'अॅपल डाएट प्लॅन'. जाणून घेऊयात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कसं परिणामकारक ठरतं हे डाएट. अॅपल डाएट हे प्रामुख्याने सफरचंदावर अवलंबून असलेलं डाएट आहे. सफरचंदाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत त्यामुळे दररोजच्या आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होते. 

अॅपल डाएट म्हणजे काय?

या डाएटनुसार, तुम्हाला आहारामध्ये जास्तीतजास्त सफरचंदांचा समावेश करावा लागतो. पहिल्या दिवशी डाएटीशियन फक्त एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. दुसऱ्या दिवशी तुम्हाला नाश्ता, दुपारचं जेवणं आणि रात्रीच्या जेवणामध्ये सफरचंद खाण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यानंतर उरलेले तीन दिवस तुम्हाला तुमच्या आहारात फळं, ज्यूस, भाज्या, प्रोटीन आणि डेअरी प्रोडक्टचा समावेश करणं गरजेचं असतं. 

कसं कमी होतं वजन?

सफरचंद मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे तुम्हाला फक्त 80 ते 100 कॅलरी मिळतात. सफरचंद नर्वस सिस्टिमसाठीही फायदेशीर ठरतं. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. जेवणाआधी एक सफरचंद खाल्यामुळे तुम्हाला कमी भूक लागते. 

Image result for weight loss

अॅपल डाएटचा पहिला दिवस :
नाश्ता - 2 सफरचंद 
दुपारचं जेवण - 1 सफरचंद 
रात्रीचं जेवण - 3 सफरचंद

अॅपल डाएटचा दुसरा दिवस :
नाश्ता - 1 सफरचंद, एक ग्लास सोया मिल्क
दुपारचं जेवण - 1 सफरचंद, सलाड, व्हेजिटेबल ज्यूस
रात्रीचं जेवण - 2 सफरचंद

अॅपल डाएटचा तिसरा दिवस :
नाश्ता - 1 सफरचंद 
दुपारचं जेवण - 1 सफरचंद, सलाड
संध्याकाळचा नाश्ता - एक कप दही
रात्रीचं जेवण - 2 सफरचंद, सलाड आणि सूप 

अॅपल डाएटचा चौथा दिवस :
नाश्ता - 1 सफरचंद, केळ्याची स्मूदी
दुपारच्या जेवणाआधी - एक वाटी कलिंगड किंवा संत्री
दुपारचं जेवण - 2 सफरचंद, भाजी आणि सूप 
रात्रीचं जेवण - 1 सफरचंद आणि बीटाची स्मूदी

अॅपल डाएटचा पाचवा दिवस :
नाश्ता - 1 सफरचंद आणि 1 उकडलेलं अंड
दुपारच्या जेवणाआधी - 2 बदाम आणि 1 पीच 
दुपारचं जेवण - 1 सफरचंद आणि भाजी
संध्याकाळचा नाश्ता -  1 कप ग्रीन टी
रात्रीचं जेवण - 1 सफरचंद आणि स्प्राउट्स 

या गोष्टी लक्षात ठेवा :

वजन कमी करण्यासाठी जेवढं डाएट गरजेचं असतं तेवढाच व्यायामही आवश्यक असतो. त्यामुळे अॅपल डाएटसोबतच दररोज वर्कआउट करणंही गरजेचं आहे. याव्यतिरिक्त दिवसभर भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे डाएट फॉलो करण्याआधी डाएटीशियनचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

सफरचंदाचे आरोग्यदायी फायदे :

  • वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 
  • कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी
  • डायबिटीजचा धोका कमी
  • पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी 

 

टीप : प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते. त्यामुळे कोणतंही डाएट फॉलो करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: weight loss tips how to lose 3kg in one week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.